महादेवी हत्तीण परत द्या, राष्ट्रपतींना सह्यांसह साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:00 IST2025-08-03T12:59:49+5:302025-08-03T13:00:29+5:30
महादेवी हत्तिणीचा ताबा परत स्वस्तिश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे द्यावा, यासाठी जयसिंगपूरसह उदगाव, कवठेसार, कोथळी, निमशिरगाव, माणगाव येथे शनिवारी सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला.

महादेवी हत्तीण परत द्या, राष्ट्रपतींना सह्यांसह साकडे
कोल्हापूर : आमची महादेवी हत्तीण परत द्या, असा एकच नारा देत कोल्हापुरातील २ लाख ४ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले फॉर्म राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिवारी कसबा बावडा रमण मळ्यातील पोस्ट कार्यालयातून पाठवण्यात आले.
ठिकठिकाणी सर्वधर्मीय, सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा
नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तिणीला पोलिस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम राबविली.