शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'शेअर'मधील नफ्याच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्याची ३३ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:10 IST

निवृत्तीचे पैसे आमिषाने गुंतविले अन् फसले...

कोल्हापूर : शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून बनावट ॲपद्वारे शासनाच्या पशुसंर्वधन विभागाचे निवृत्त अधिकारी विजयानंद रत्नाकर पाटील (वय ५९, रा. नलवडे प्लॉट, प्रतिभानगर, कोल्हापूर) यांची ३३ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. दि. १ मे ते दि. ८ जून २०२५ अखेर व्हॉटसॲपवर लिंकवरील चॅटिंगद्वारे पाच मोबाइल क्रमांकाद्वारे श्रीकृष्णरथ असे नाव सांगणाऱ्याने त्यांची फसवणूक केली.पोलिस फिर्यादीत म्हटले आहे, की पाटील हे वर्षापूर्वीच निवृत्त झाले आहेत. शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवणुकीसंबंधी मोबाइलवर माहिती घेताना गुगल प्ले स्टोअरमध्ये काही ॲप असल्याचे त्यांना समजले. दरम्यान, पाटील यांच्या मोबाइल क्रमांकावरील व्हॉटसॲपवर ९३४१८१००५१, ८९६२९८३७९२, ९६८५३५९१४१, ६२९९६३३२६९, ७४८८७१७३८४ या मोबाइल क्रमांकावरून मेसेज येत होते. पाटील यांना ‘ अबाउट वेल्थ मॅनेजमेंट कम्युनिटी’ असे इंग्रजीत लि. कोलकत्ता या कंपनीचे सेबीने स्टॉक ब्रोकर म्हणून नोंदणीकृत प्रमाणपत्र पाठविले. ७४८८७१७३८४ या व्हॉटसॲपवर श्रीकृष्णरथ नावच्या व्यक्तीने पहिल्यांदा पाटील यांना व्हिडिओ कॉल करून पडताळणी करून खात्री करून घेतली.

व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून पाटील यांना अबाउट वेल्थ मॅनेजमेंट या नावाचे शेअर्स ट्रेडिंगचे बनावट ॲप सुरू करण्यास भाग पाडले. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊन पाटील यांना शेअर्स ट्रेडिंगमध्ये जास्त नफा असल्याचे सांगत विश्वास मिळवला. बँक खाते क्रमांक देऊन पैसे गुंतवण्यास सांगितले. पाटील यांनी मे महिन्यात पहिल्यांदा एक लाख रुपये गुंतवले. यावर ॲपवर त्यांना १५ हजार रुपये जादा दिसू लागले. मात्र काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते निघत नव्हते. हे पैसे काढायचे असतील तर पुन्हा पैसे भरावे लागतील. असे सांगत पाटील यांना ८ जून २०२५ पर्यंत सुमारे ३० लाख रुपये पाठवले.

तीस लाख रुपये हवे असतील तर पुन्हा ३ लाख ४५ हजार रुपये भरा, असे सांगण्यात आले. अशाप्रकारे पाटील यांची ३३ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ग्रुप आणि मोबाइल नंबरही गायब झाल्यानंतर पाटील यांना फसगत झाल्याचे कळाले. मग त्यांनी राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली.

निवृत्तीचे पैसे आमिषाने गुंतविले अन् फसले...पाटील हे निवृत्त झाल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे फंड मिळाले होते. त्यांच्या खात्यावर ३० लाखांहून अधिक रक्कम होती. शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषांना त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि त्यांची फसवणूक झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Retired Officer Duped of ₹33 Lakhs in Share Trading Scam

Web Summary : A retired animal husbandry officer from Kolhapur lost ₹33.45 lakhs to a share trading scam via a fake app. Lured by high profits, he invested after being contacted on WhatsApp and shown false credentials. Police have registered a case.