'दत्त'चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक डी.एस.गुरव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:50 IST2020-10-07T18:48:26+5:302020-10-07T18:50:27+5:30

suger, gadhinglaj, kolhapur देशाच्या साखर उद्योगातील गाढे अभ्यासक दत्तात्रय शिवलिंग तथा डी.एस.गुरव (वय ७९ मूळगांव कौलगे ता. गडहिंग्लज सध्या रा.माळी कॉलनी,टाकाळा- कोल्हापूर)यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली,जावई,नातवंडे ,भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे.

Retired Executive Director of 'Dutt' DS Gurav passes away | 'दत्त'चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक डी.एस.गुरव यांचे निधन

'दत्त'चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक डी.एस.गुरव यांचे निधन

ठळक मुद्दे'दत्त'चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक डी.एस.गुरव यांचे निधनसाखर उद्योगातील चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून परिचित

गडहिंग्लज : देशाच्या साखर उद्योगातील गाढे अभ्यासक दत्तात्रय शिवलिंग तथा डी.एस.गुरव (वय ७९ मूळगांव कौलगे ता. गडहिंग्लज सध्या रा.माळी कॉलनी ,टाकाळा- कोल्हापूर)यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली,जावई,नातवंडे ,भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. साखर उद्योगातील एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून ते सर्व परिचित होते.

शिरोळ येथील श्री.दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदावरुन ते निवृत्त झाले होते.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या 'पहिल्या आदर्श कार्यकारी संचालक' पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता.

दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकतील अनेक साखर कारखान्यांच्या उभारण्यासाठी मार्गदर्शन केले.
आजरा,वारणा, दत्त,कृष्णा साखर कराड,शिवशक्ती साखर,दालमिया शुगर्स,सोमय्या शुगर्स ग्रुप आदी साखर उद्योग समुहांना त्यांनी उर्जितावस्था मिळण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे अधिष्ठाता डॉ.ए.एम.गुरव यांचे ते चुलते, गडहिंग्लज येथील 'पंचम डेअरीज'चे कार्यकारी संचालक व नगरसेवक बाळासाहेब गुरव यांचे मामा तर कोल्हापूर येथील प्रसिद्ध हृदय रोगतज्ज्ञ डॉ. विद्या पाटील यांचे वडील होत. 

Web Title: Retired Executive Director of 'Dutt' DS Gurav passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.