विशाळगड येथील ऊरुस पूर्ववत सुरू करा, बाबा मलिक रेहान मीरासाहेब संस्थेची मागणी; दंगलीपासून संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:16 IST2025-01-02T15:15:35+5:302025-01-02T15:16:20+5:30
कोल्हापूर : विशाळ गड येथील ऊरुस पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी हजरत शेख अल्लाउद्दीन शाह कादरी उर्फ बाबा मलिक ...

विशाळगड येथील ऊरुस पूर्ववत सुरू करा, बाबा मलिक रेहान मीरासाहेब संस्थेची मागणी; दंगलीपासून संचारबंदी
कोल्हापूर : विशाळगड येथील ऊरुस पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी हजरत शेख अल्लाउद्दीन शाह कादरी उर्फ बाबा मलिक रेहान मीरासाहेब बहुउद्देशिय सामाजिक संस्थेकडून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
विशाळगड येथे दरवर्षी हजरत मलिक रेहान मीरासाहेब बाबांचा ऊरुस साजरा होतो. मात्र, १४ जुलैला झालेल्या जातीय दंगलीनंतर येथे संचारबंदी आदेश लागू केला आहे. देशात धार्मिक स्थळांना भाविकांना ये-जा करणेस कोणताही अडथळा येत नाही. परंतु, विशाळगडजवळ केंबुर्णीवाडी येथे पोलिसांकडून अडवणूक केली जाते व संचारबंदी चालू आहे, असे सांगून परत पाठवले जाते.
विशाळगड येथील बंदी आदेश शिथिल करून भाविकांची ये-जा सुरू करण्यात यावी व ऊरूस पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अखित बिरजार, बलरोग रणदिवे, छोटू शेख, नवाब शेख, युसुफ शेख, समीर शेख, साजिद पटेल, अन्दर शेख, शबाना नवाथ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.