पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, कोल्हापुरातील 'इतके' विद्यार्थी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 19:18 IST2021-11-24T19:05:39+5:302021-11-24T19:18:17+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दि. १२ ऑगस्ट रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक ...

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, कोल्हापुरातील 'इतके' विद्यार्थी पात्र
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दि. १२ ऑगस्ट रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर केला. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी एकूण ८७०४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ५ डिसेंबरपर्यंत आहे.
या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ३२७४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३१४५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १२९८ जण गैरहजर राहिले. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८७०४ जण अंतरिम निकालातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांच्या पात्रतेची टक्केवारी २९.१३, तर आठवीमधील विद्यार्थ्यांच्या पात्रतेची टक्केवारी २५.११ इतकी आहे. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला आहे.