शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ची बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर

By admin | Updated: September 4, 2016 01:28 IST

सत्तारूढ गटाचा इशारा : पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे - सतेज पाटील

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने आपल्या गुणवत्तेच्या बळावर देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे; पण राजकीय द्वेषातून संघाची बदनामी सुरू आहे. आगामी सर्वसाधारण सभेत अशा प्रवृत्तीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सत्तारूढ गट समर्थकांच्या बैठकीत देण्यात आला. संघाच्या बुधवारी (दि. ७) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सत्तारूढ व विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सत्तारूढ गटाच्या समर्थकांची शनिवारी ताराबाई पार्क येथे बैठक झाली. त्यामध्ये विरोधकांचे आव्हान रोखण्याची रणनीती ठरविण्यात आली. गेले आठ-दहा दिवस तालुका संपर्कसभा घेऊन सर्वसाधारण सभेतील तणाव कमी करण्याचा संचालकांनी प्रयत्न केला आहे. सत्तारूढ गटाच्या समर्थकांची बैठक घेऊन विरोधकांना कसे रोखता येईल, याची व्यूहरचना ठरविण्यात आली. विरोधक कोणत्या मुद्द्यांवर कोंडीत पकडणार, त्याला उत्तर कसे द्यायचे, याची चर्चा झाली. विरोधकांकडून संघाची बदनामी सुरू असून, वासाचे दूध स्वीकारले तर गुणवत्तेबाबत बाजारपेठेत चुकीचा संदेश जाईल; त्यामुळे संघाची बदनामी करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बैठकीला आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, यांच्यासह सत्तारूढ गटाचे समर्थक उपस्थित होते. दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी सभेच्या कामकाजाबाबत विभागीय उपनिबंधकांबरोबरच पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. सभासद नसणाऱ्या व्यक्तींना उपस्थित ठेवून व्यत्यय, तसेच गोंधळ निर्माण करण्याचा व प्रश्नच विचारू न देण्याचा प्रयत्न सत्तारूढ गटाकडून होऊ शकतो. लोकशाही पद्धतीने सभा होण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे केली आहे.