नागणवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न निकालात काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:03+5:302021-04-06T04:23:03+5:30
कोल्हापूर : नागणवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर निकालात काढा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिल्या. ...

नागणवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न निकालात काढा
कोल्हापूर : नागणवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर निकालात काढा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागणवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, एस. आर. पाटील, अमोल नाईक उपस्थित होते.
नागणवाडी प्रकल्पग्रस्तांच्या पॅकेज अंतर्गत २३ कोटी रुपये आले होते. त्यापैकी १७ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. जमीन संकलनानुसार ३८ कुटुंबे शिल्लक राहिली आहेत. १८ कुटुंबांचे पॅकेज वाटप या आठवड्यात पूर्ण होईल. उर्वरित १२ कुटुंबांचे अर्ज अद्याप आलेले नाहीत व आठ कुटुंबांकडून जमीन मागणी अर्ज आलेले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
--
दुधगंगा व सर्फनाला प्रकल्पग्रस्तांची बैठक पुढील आठवड्यात
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, दुधगंगा व सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्याही काही समस्या आहेत. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊन कार्यवाही केली जाईल.
--
फोटो नं ०५०४२०२१-कोल-मुश्रीफ बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नागणवाडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे व अधिकारी उपस्थित होते.
--