शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

आलाबादमध्ये भूसंपादनास विरोध

By admin | Updated: January 21, 2015 23:57 IST

शेतकऱ्यांत चकमक : झुलपेवाडीचे पाणी अडवणार : प्रकल्पग्रस्त

सेनापती कापशी : बारवे-दिंडेवाडी प्रकल्पानुसार जमिनीचा कब्जा घेण्यासाठी आलाबाद (ता. कागल) येथे आले असता प्रकल्पग्रस्त व लाभधारक यांच्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्यासमोरच शाब्दिक चकमक झाली. यातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला.२००० सालापासून दिंडेवाडी-बारवे प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेव्हापासून जमिनी शासनाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज, बुधवारी आलाबाद (ता. कागल) येथे प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा कब्जा देण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी आले असता आलाबाद येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला. यातील काही शेतकरी भूसंपादनाच्या विरोधात हायकोर्टात गेले असल्यामुळे कोर्टाचा निकाल लागेपर्यंत थांबावे लागणार आहे. दरम्यान, सूर्यवंशी गटनंबरप्रमाणे सुनावणी करत असताना अचानक प्रकल्पग्रस्त व लाभधारक यांच्यात सकाळपासून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचे हाणामारीत रूपांतर झाले.आम्ही जमिनी दिल्या म्हणून प्रकल्प होत आहे, असे असताना आम्हालाच जर मारहाण होणार असेल, तर दिंडेवाडी-बारवे प्रकल्पच रद्द करा व आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, अन्यथा येत्या काही दिवसांत चिकोत्रा प्रकल्पातील पाणी अडविण्याचा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला. दरम्यान, आलाबाद (ता. कागल) येथील शेतकऱ्यांनीही बेकायदा जमीन संपादन थांबविण्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, प्रकल्पग्रस्तांना जमिनी या द्याव्या लागतील. आलाबाद (ता. कागल) येथील बरेच शेतकरी कोर्टात गेले आहेत. त्यामुळे कोर्टाचा निकाल लागेपर्यंत व स्टेआॅर्डर असल्यामुळे निकालानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरू केली जाईल. तोपर्यंत जे शेतकरी स्वखुशीने कब्जा देण्यास तयार आहेत. त्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.