कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:32+5:302021-02-05T07:09:32+5:30
भारती विद्यापीठ भारती विद्यापीठाच्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्र. संचालक प्रा. डॉ. रवींद्र मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात ...

कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन उत्साहात
भारती विद्यापीठ
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्र. संचालक प्रा. डॉ. रवींद्र मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख डॉ. के. एम. अलास्कर, इंद्रजित देसाई, वैशाली पाटील आदी उपस्थित होते.
ज्ञानहो विद्यामंदिर
राधानगरी रोड येथील ज्ञानहो विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष टी. एस. कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य मयुरी कदम, टी. एम. कदम आदी उपस्थित हाेते.
महात्मा फुले हायस्कूल
लक्षतीर्थ वसाहत येथील महात्मा फुले हायस्कूल व मराठी शाळा येथे माजी नगरसेविका अनुराधा खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उमेश गुरुजी, मुख्याध्यापिका एल. एम. पोवार आदी उपस्थित होते.
मास्टर दिनानाथ विद्यामंदिर
डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित मास्टर दिनानाथ विद्यामंदिर येथे प्रतिष्ठानचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पद्मजा आडनाईक, पुष्पलता पाटील, नारायण येटाळे, सर्जेराव राबाडे आदी उपस्थित होते.
दि न्यू एज्युकेशन सोसायटी
दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित सर्व शाळांच्यावतीने पेटाळा मैदानावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, एच. बी. खानविलकर, क्रीडाशिक्षक सयाजी पाटील, महेश सूर्यवंशी, प्राचार्य एस. एस. चव्हाण, प्राध्यापक उमा भेंडीगिरी आदी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्ष
शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्यावतीने सारिका आवटी यांचे आहार आणि आरोग्यविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी ॲड. उज्ज्वला कदम, ज्योती पाटील, मीनाक्षी पाटील, आदी उपस्थित होते.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष बी. जी. बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. सूर्यकांत खांडेकर शिक्षक सेवागौरव पुरस्कार, श्री प्रिन्स शिवाजी प्रशासकीय सेवक सेवा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, सी. आर. गोडसे, डॉ. पी. के. पाटील आदी उपस्थित होते.
शहर राष्ट्रवादी कार्यालय
शिवाजी स्टेडियम येथील पक्षाच्या शहर कार्यालयात शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. निरंजन कदम, अनिल घाटगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सुनील देसाई, माजी नगरसेवक सुनील पाटील, जहिदा मुजावर, महेंद्र चव्हाण, संजय कुराडे आदी उपस्थित होते.
बाजार समिती
शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय प्रशासक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी अजित पाटील, दगडू भास्कर, जयवंत पाटील, के. बी. पाटील आदी उपस्थित होते.
शिवाजी मराठा हायस्कूल
शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मेघराज खराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य पी. डी. काटकर, सचिव अजित खराडे, सहसचिव शिवतेज खराडे आदी उपस्थित होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
बिंदू चौकातील शहर कार्यालयात आयटकचे ज्येष्ठ नेते दिलीप पवार यांच्या हस्ते ध्वजरोहण झाले. यावेळी रमेश वडणगेकर, दिलदार मुजावर, बाबा ढेरे, धीरज काटारे आदी उपस्थित होते.
कलामंदिर महाविद्यालय
संस्थेचे अध्यक्ष मारुतराव कातवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संजय निगवेकर, प्राचार्य किशोर पुरेकर, सर्जेराव निगवेकर, डॉ. डी. डी. कुंभार, राजेंद्र वागवेकर आदी उपस्थित होते.
गुरुकुल विद्यालय
संस्थेच्या अध्यक्षा माधुरी मेतके देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुंबईतील पिहीका शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक एस. डी. नलवडे उपस्थित होते.
ओरिएंटल इंग्लिश स्कूल
संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक रविकिरण मोहिते, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा बावले उपस्थित होत्या.
वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्रा. डी. जे. चाफोडीकर, डॉ. मनिषा पाटील, डॉ. ए. आर. पाटील, प्रा. एस. जे. पाटील, डॉ. उर्मिला पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : २८०१२०२१ कोल प्रजासत्ताक दिन न्यूज
ओळी : कोल्हापुरातील राष्ट्रवादी शहर कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.