शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

व्यसनांचे समर्थन करणाऱ्यांचा धिक्कार

By admin | Updated: April 17, 2015 00:06 IST

प्रबोधन रॅली : जनस्वास्थ्य दक्षता समितीचे आयोजन; विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर : ‘तंबाखूच्या व्यसनांचे समर्थन करणाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘खा गुटखा, मोज घटका’, ‘एक, दोन, तीन, चार, तंबाखूला करू हद्दपार’, अशा घोषणा देत जनस्वास्थ्य दक्षता समितीने गुरुवारी शहरातून प्रबोधन रॅली काढली. त्यात महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.खासदार दिलीप गांधी, शामचरण गुप्ता व रामप्रसाद सरमाह यांनी तंबाखूच्या व्यसनाचे समर्थन केले आहे. त्यांचा निषेध करण्यासह तंबाखूजन्य पदार्थांना प्रतिबंध असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ‘जनस्वास्थ्य’तर्फे रॅली आयोजित केली होती. दसरा चौकातून सकाळी पावणेअकरा वाजता रॅलीला प्रारंभ झाला. व्हीनस कॉर्नर, उद्योग भवनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात रॅली आली. याठिकाणी प्रवेशद्वारावर समितीचे कार्यकर्ते, विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावरील नियंत्रण धोरणाच्या आखणीसाठी नियुक्त केलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी, गुप्ता व सरमाह यांनी तंबाखूच्या व्यसनाचे समर्थन केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणे यांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाणे, थुंकणे, धूम्रपान करणे यावर प्रतिबंध असणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. रस्ते ही देखील सार्वजनिक ठिकाणे आहेत. रस्त्यावर थुंकल्यास अस्वच्छता, सार्वजनिक आरोग्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो म्हणूनच रस्त्यांवरही तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्यास प्रतिबंध करावा.रॅलीत ‘जनस्वास्थ्य’चे अध्यक्ष दीपक देवलापूरकर, सुरेश शिपूरकर, शामराव कांबळे, अजित अकोळकर, सुरेश पाटील, बृहस्पती शिंदे, डी. डी. टिपकुर्ले, सुधीर हांजे, अरविंद कायंदे, प्रतीक निंगुरे, अमर देसाई, करिष्मा चिरमुरे, ओंकार पाटील, सीमा गावडे, अवधूत गायकवाड आदींसह डी. डी. शिंदे कॉलेज, कृषी महाविद्यालय, शहाजी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते.असा दिला संदेशसडोली खालसा विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या आजारांच्या दुष्परिणामांबाबत चेहरे रंगवून प्रबोधन केले. महाविद्यालयीन विद्यार्थी ‘गुटखा, तंबाखू, धूम्रपानाचे बळी, ‘खा गुटखा, मोज घटका’ अशा उल्लेखाचे फलक घेऊन सहभागी झाले होते.