गोकुळमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 13:06 IST2021-04-14T04:23:00+5:302021-04-14T13:06:47+5:30

Gokul Milk Election Kolhapur: ‘गोकुळ’च्या स्थापनेपासून धनगर समाजाला संचालक मंडळात संधी मिळालेली नाही. शंभराहून अधिक ठराव समाजाचे असून, या वेळेला राजर्षी शाहू आघाडीतून प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी धनगर समाजातील विविध संघटनांच्या वतीने बैठकीत करण्यात आला.

Represent the Dhangar community in Gokul | गोकुळमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्या

गोकुळमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्या

ठळक मुद्देगोकुळमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्याधनगर समाजातील विविध संघटनांच्या बैठकीत मागणी

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या स्थापनेपासून धनगर समाजाला संचालक मंडळात संधी मिळालेली नाही. शंभराहून अधिक ठराव समाजाचे असून, या वेळेला राजर्षी शाहू आघाडीतून प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी धनगर समाजातील विविध संघटनांच्या वतीने बैठकीत करण्यात आला.

गोकुळ’च्या निवडणुकीसाठी मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख बयाजी शेळके यांनी भटक्या विमुक्त जाती, जमाती गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. अध्यक्षस्थशनी यशवंत सेनेचे प्रमुख राजेश तांबवे होते.

यावेळी मल्हारसेना सरसेनापती बबन रानगे, नूतन नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष, प्रा. शंकरराव पुजारी, धनगर महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघू हजारे, क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, युवक संघटना जिल्हाध्यक्ष प्रल्हाद देबाजे, मल्हारसेना जिल्हाप्रमुख शहाजी सिद, बंडू बरगाले, यशवंत सेनेचे डॉ. संदीप हजारे, कृष्णात रेवडे, पांडुरंग वगरे, चंद्रकांत वाळकुंजे यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Represent the Dhangar community in Gokul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.