वडनेरे समितीचा सोमवारी होणार सादर कृष्णा भीमा खोरे महापुराचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:09 AM2020-05-22T02:09:48+5:302020-05-22T06:23:44+5:30

समितीचे सदस्य जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही समिती चर्चेत आली.

The report of Krishna Bhima Khore Mahapura will be presented by the Wadnere Committee on Monday | वडनेरे समितीचा सोमवारी होणार सादर कृष्णा भीमा खोरे महापुराचा अहवाल

वडनेरे समितीचा सोमवारी होणार सादर कृष्णा भीमा खोरे महापुराचा अहवाल

Next

- विश्वास पाटील

कोल्हापूर : गेल्या पावसाळ्यात कृष्णा भीमा खोऱ्यात आलेल्या महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या नंदकुमार वडनेरे समितीचा ६०० पानांचा अहवाल सोमवारी राज्य सरकारला सादर होणार आहे. समितीचे सदस्य जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही समिती चर्चेत आली. राज्याच्या व्यापक हिताचे जे आहे तेच समितीचा अध्यक्ष म्हणून करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे नंदकुमार वडनेरे
यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट
केले.
पुरंदरे यांनी या अहवालातील अंतिम मसुद्यातून दोन प्रकरणे गायब झाल्याचे सांगून समितीचा राजीनामा दिला; त्याबद्दल वडनेरे म्हणाले, कुणी गैरसमजातून काही आक्षेप घेतले असतील तर या घडीला मला त्या टीका टिप्पणीत पडायचे नाही. रिमोट सेन्सिंग तंत्राच्या आधारे महापुरातील सर्व छायाचित्रे वापरून आम्ही अहवाल तयार केला आहे. जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

माझ्यासमोर आजच्या घडीला हा अहवाल पूर्ण करून तो शासनाला तातडीने सादर करणे याला जास्त प्राधान्य आहे. त्यावरच मी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सगळ्या तज्ज्ञांनी सुचविलेले सगळेच मुद्दे अहवालात समाविष्ट करणे शक्य नसते.
- नंदकुमार वडनेरे,
अध्यक्ष, कृष्णा भीमा खोरे पूर परिस्थिती अभ्यास समिती

Web Title: The report of Krishna Bhima Khore Mahapura will be presented by the Wadnere Committee on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.