गंगावेशमध्ये हायमास्टवर अंबाबाईच्या मळवटीची प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:50 IST2020-07-24T17:48:25+5:302020-07-24T17:50:01+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे वास्तव्य असणाऱ्या कोल्हापूर नगरीतील ऐतिहासिक गंगावेश चौक येथे अंबाबाई देवीच्या मळवटाची प्रतिकृती हायमास्टवर बसविण्यात आली आहे.

गंगावेशमध्ये हायमास्टवर अंबाबाईच्या मळवटीची प्रतिकृती
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे वास्तव्य असणाऱ्या कोल्हापूर नगरीतील ऐतिहासिक गंगावेश चौक येथे अंबाबाई देवीच्या मळवटाची प्रतिकृती हायमास्टवर बसविण्यात आली आहे.
तिरुपती येथे ठिकठिकाणी श्री बालाजीचे एलईडी स्वरूपातील प्रतिकृती बसविण्यात आल्या आहेत. ह्या संकल्पनेच्या आधारावर नगरसेवक शेखर कुसाळे यांनी कोल्हापुरात ही संकल्पना मांडली आहे. यातून भाविक व पर्यटनास चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले.
आर्किटेक्ट रणजित निकम यांनी याचे डिझाइन केले. हे काम उल्का लाईटस्चे शीतल दुर्गुळे यांनी केले असून याकामी कोल्हापूर महानगरपालिकेचे सहकार्य लाभले.
सध्या हे लोकांचे आकर्षण ठरत आहे. यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र ओबीसी अध्यक्ष संदीप कुंभार, राजू चव्हाण, संताजी भोसले व नागरिक उपस्थित होते.