अल्पसंख्याक शिष्यवृत्तीतील जाचक अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:22+5:302021-02-05T06:59:22+5:30

इचलकरंजी : केंद्र शासनाने अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मिळण्याबाबत जाचक अटी घातल्या आहेत. त्या रद्द व्हाव्यात, अशा मागणीचे निवेदन शहर ...

Repeal the oppressive condition of minority scholarships | अल्पसंख्याक शिष्यवृत्तीतील जाचक अट रद्द करा

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीतील जाचक अट रद्द करा

इचलकरंजी : केंद्र शासनाने अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मिळण्याबाबत जाचक अटी घातल्या आहेत. त्या रद्द व्हाव्यात, अशा मागणीचे निवेदन शहर कॉँग्रेस समितीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.

निवेदनात केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारे सन २००९ पासून देशातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना सुरू आहे. या योजनेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक एक हजार रुपये इतकीच शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी या योजनेमध्ये पात्र विद्यार्थ्यांना जाचक अटी घातल्या नव्हत्या. मात्र, चालू वर्षी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी शासनाने जाचक अटी घातल्या असून, कागदपत्रे संकलित करण्यासाठी पालकांना बराच खर्च येत आहे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात नगरसेवक शशांक बावचकर, बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, रियाज चिकोडे आदींचा समावेश होता.

फोटो ओळी

०३०२२०२१-आयसीएच-०३

शिष्यवृत्ती मिळण्याबाबत घातलेल्या जाचक अटी रद्द व्हाव्यात, या मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.

Web Title: Repeal the oppressive condition of minority scholarships