सराफ व्यापारी संघाच्या इमारतीचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:22+5:302021-03-06T04:22:22+5:30
कोल्हापूर : येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या घाटी दरवाजा येथील इमारतीचा नूतनीकरण शुभारंभ उपाध्यक्ष जितेंद्र राठोड व सभासद मुरलीधर ...

सराफ व्यापारी संघाच्या इमारतीचे नूतनीकरण
कोल्हापूर : येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या घाटी दरवाजा येथील इमारतीचा नूतनीकरण शुभारंभ उपाध्यक्ष जितेंद्र राठोड व सभासद मुरलीधर पोतदार यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.
सराफ व्यापारी संघाची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराशेजारी घाटी दरवाजा येथे इमारत आहे. येथे सोने-चांदी टंच विभाग असून, तो बरीच वर्षे जुना आहे. काळानुरूप संस्थेचे नूतनीकरण गरजेचे झाल्याने हे काम आता सुरू करण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), रवींद्र राठोड, संचालक शिवाजी पाटील, ललित गांधी, तेजस धडाम, प्रीतम ओसवाल, किशोर परमार, प्रसाद कालेकर, विक्रम कुलकर्णी यांच्यासह सभासद उपस्थित होते.
--
फाेटो नं ०५०३२०२१-कोल-सराफ संघ
फोटो –
कोल्हापुरात गुरुवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या इमारत नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र राठोड यांच्यासह संचालक उपस्थित होते.
----
सराफ व्यापारी संघाच्या इमारतीचे नूतनीकरण.