शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

टोलमुक्तीचा वटहुकूम काढा

By admin | Updated: June 27, 2014 01:13 IST

मुख्यमंत्र्यांना आवाहन : टोलविरोधी कृती समितीचे कऱ्हाडात धरणे

मलकापूर (कऱ्हाड) : ‘शहराअंतर्गत टोल देशात कुठेही नाही. आंदोलने करून कोल्हापूरवासीयांची सहनशीलता संपली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या अधिकारात कोल्हापूर टोलमुक्तीचा वटहुकूम काढावा; अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापुरात फिरकूही देणार नाही,’ असा इशारा टोलविरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. कऱ्हाड येथील बाजार समितीच्या मैदानात टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कृती समितीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे म्हणाले, ‘कोल्हापूर शहरातील तीन लाख चौरस फुटाचा भूखंड ‘आयआरबी’च्या ताब्यात आहे. त्याचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करावे व आयआरबीने केलेल्या कामाचेही मूल्यांकन करावे. ज्यांचे देणे लागेल, त्यांचे देणे मुख्यमंत्र्यांनी भागवावे. मात्र, हा शहरातील जनतेवरील अन्याय थांबवावा, अन्यथा कोल्हापूरची जनता पेटून उठेल.’ बाबा इंदूलकर म्हणाले, ‘कोल्हापूरची शाहू महाराजांची संस्कृती वेगळी आहे. आंदोलकांना कऱ्हाड शहराच्या एका बाजूला जागा देऊन प्रशासनाने दुजाभाव केला आहे. टोल रद्द हा निर्णय लवकर नाही घेतल्यास शासन व प्रशासनास मोठी किंमत मोजावी लागेल.’ यावेळी दिलीप देसाई, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, चंद्रकांत यादव, दिलीप पोवार, महापौर सुनीता राऊत, ‘जनसुराज्य’चे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे राजू लाटकर, विरोधी गटनेते मुरलीधर जाधव, अनिल राऊत, विनायक फाळके, रमेश पुरेकर, प्रकाश काटे, जयकुमार शिंदे, दीपा पाटील, वैशाली महाडिक, सुचिता साळोखे, सुजाता चव्हाण, आक्काताई जाधव, विजया फुले यांच्यासह सुमारे तीनशे आंदोलक अांदोलनात सहभागी झाले होते. शासनाच्या प्रतिनिधीला खर्डा-भाकरीची न्याहरी टोलविरोधी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रांताधिकारी शिरीष यादव, पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील अांदोलनस्थळी आले. त्यावेळी अांदोलनकर्त्यांनी त्यांचे म्हणणे शासनाच्या प्रतिनिधीसमोर मांडून डब्यातून आणलेली खर्डा-भाकरी न्याहरीसाठी त्यांना देण्यात आली.