शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
4
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
5
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
6
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
7
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
8
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
9
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
10
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
11
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
12
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
14
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
15
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
16
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
17
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
18
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
19
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
20
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
Daily Top 2Weekly Top 5

बायोमॅट्रीक हजेरीतील त्रुटी दूर करा

By admin | Updated: March 11, 2017 00:07 IST

मनपा कर्मचारी संघ : बुधवारपर्यंत पूर्तता न झाल्यास काम बंद

कोल्हापूर : महानगरपालिकेने बायोमॅट्रीक हजेरी पद्धतीतील त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत सर्व कामगारांचा पगार मॅन्युअल पद्धतीने काढावा. ज्या कर्मचाऱ्यांची जानेवारीपासून बायोमॅट्रिकमधील दोषांमुळे गैरहजेरी नोंद होऊन पगार कपात झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांना पगार अदा करावा, अन्यथा बुधवारपासून (दि. १५) सर्व कर्मचारी ‘काम बंद’आंदोलन करतील, असा इशारा पालिका कर्मचारी संघाने शुक्रवारी आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदनाद्वारे दिला. पालिका प्रशासनाने कामगार, कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी पद्धत सुरू केली आहे; परंतु या पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. त्याबाबत कर्मचारी संघाने तक्रार केली होती. त्याअनुषंगाने २ फेब्रुवारीला प्रशासन आणि कर्मचारी संघ प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. यावेळी संघाच्या प्रतिनिधींनी काही मुद्दे लेखी सादर केले होते; परंतु त्रुटींची पूर्तता झाली नाही. त्यामुळे २ मार्चला संघाने प्रशासनाला पत्र पाठवून त्रुटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांची हजेरी मॅन्युअल पद्धतीने नोंद करून पगार काढावा अशी मागणी केली होती, पण त्याचीही दखल घेतली नाही. बायोमॅट्रीक पद्धतीमधील दोषामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांची हजर राहूनही गैरहजेरी नोंदविल्या गेल्या. त्यामुळे त्यांचे पगार निघाले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या त्रुटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचा पगार मॅन्युअल पद्धतीने काढावा, ज्या कर्मचाऱ्यांचा जानेवारीपासून बायोमॅट्रीक पद्धतीमुळे गैरहजेरी नोंद होऊन पगार कपात झाला आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना पगार अदा करावा. यासंदर्भात १५ मार्चपर्यंत निर्णय झाला नाही तर सर्व कर्मचारी ‘काम बंद’ आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात दिला आहे. संघाचे अध्यक्ष रमेश देसार्इंच्या सहीचे हे निवेदन आहे. सफाई कामगारांचे आंदोलन बायोमॅट्रीक हजेरी पद्धतीमुळे काम करूनही गैरहजेरी नोंदविल्या गेलेल्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ई-३ या वॉर्डात काम बंद आंदोलन केले. वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन बायोमॅट्रीक मशीन बंद राहतात. जर काम करूनही गैरहजेरी पडणार असेल तर मग काम तरी कशाला करायचे अशा शब्दांत या कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना वगळापालिकेकडील अग्निशमन, रुग्णवाहिका, शववाहिका यासारख्या अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पद्धतीतून वगळावे, अशी मागणी माजी नगरसेवक अनिल कदम यांनी निवेदनाद्वारे आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. या कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा पंचिंग करण्यापूर्वीच सेवेवर जावे लागते; तसेच ‘आउट’ करतेवेळीही ते सेवा बजावत असतात. वेळेत हजेरी न दिल्याने त्यांची गैरहजेरी पडण्याची शक्यता असल्याचे त्यात म्हटले आहे.