शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत ज्योतिबावर धार्मिक विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 1:42 PM

Jyotiba Temple CoronaVIrus Kolhapur : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जिल्ह्यात पुकारण्यात आलेली संचारबंदी या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आज, सोमवारी पहाटे श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेतील धार्मिक विधी करण्यात आले. आता हा सोहळा १६ मानकऱ्यांसह देवस्थान समितीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी अशा ४५ जणांच्या उपस्थितीत होत आहे.

ठळक मुद्देमोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत ज्योतिबावर धार्मिक विधी, राजेशाही थाटात बैठी महापूजाभक्तांना घरबसल्या दर्शनाची सोय : मुख्य पालखी सोहळा सायंकाळी

जोतिबा /कोल्हापूर  :चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी, ता. २६ एप्रिल रोजी जोतिबा डोंगर येथील भाविकाविना पारंपारिक पद्धतीने चैत्र यात्रेस प्रारंभ झाला असून दख्खनचा राजा जोतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली आहे.

कोरोना संसर्गामुळे यंदा जोतिबा देवाची चैत्र यात्रा दुसऱ्यादा रद्द केली आहे. जोतिबा डोंगराकडे सर्व रस्ते बंद केले आहेत. दरम्यान, पहाटे पाच वाजता पन्हाळयाचे तहसिलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. यावेळी देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे उपस्थित होते.

सकाळी सहा वाजता जोतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली. ही पुजा प्रविण कापरे, कृष्णात दादर्णे , प्रकाश सांगळे या पुजाऱ्यांनी बांधली .दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात्रेनिमित्त होणारे धार्मिक विधी व पालखी सोहळयाचे थेट फेसबुकच्या माध्यमातून प्रसारण सुरू केले आहे. सायंकाळी हस्त नक्षत्रावर मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जोतिबा देवाचा पालखी सोहळा निघणार आहे. जोतिबा डोंगरावर मोठा पोलिस बंदोबस्त आहे.देवस्थानतर्फे लाईव्ह दर्शनाची सोयसंपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो भक्तांचे श्री ज्योतिबा हे श्रद्धास्थान आहे. त्यात संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी भक्तांना ज्योतिबाची भेट घेता येणार नाही. त्यामुळे हजारो भक्त दर्शनाची आस लावून बसले आहेत. ही बाब जाणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात्रेनिमित्त होणारे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याचे थेट फेसबुकच्या माध्यमातून प्रसारण सुरु आहे.

टॅग्स :Jyotiba Templeजोतिबाcorona virusकोरोना वायरस बातम्याReligious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर