शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली तृतीयपंथीयांचा धिंगाणा, माजी नगरसेवकासह २० जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:57 IST

हातात सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर सुरू होता धिंगाणा

कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सोमवारी देवीचे जग आणण्याच्या मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यावर काही तृतीयपंथीयांनी अत्यंत लाजिरवाणे नृत्य करण्याचा प्रकार केला. हातात सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर हा धिंगाणा सुरू होता. पुरोमागी कोल्हापुरात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.दरम्यान, धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली मद्यपान, धूम्रपान करून अश्लील हावभाव करणाऱ्या २० जणांवर मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. विनापरवाना मिरवणूक काढणे, सार्वजनिक वाहतूक बंद करणे अशा कलमांन्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये पंचगंगा तालीम मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश आनंदराव गवंडी, उपाध्यक्ष राकेश रंगराव पोवार, सलमान रियाज बागवान, नितीन बाळासाहेब साळी, किरण प्रकाश साठम (सर्व रा. शुक्रवार पेठ), तसेच १० अनोळखी व्यक्ती व अश्लील नृत्य करणाऱ्या चार अनोळखी तृतीयपंथींवर गुन्हे दाखल केले.

शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालीम मंडळाच्या वतीने तिसऱ्या सोमवारनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे देवीचे जग आणण्याची दरवर्षी प्रथा आहे. सोमवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी देवीच्या जगांची मिरवणूक पंचगंगा तालीम ते गंगावेशपर्यंत काढली. मिरवणुकीत विनापरवाना डॉल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथीयांनी समाजाला लाजवेल असे हावभाव करीत नृत्य केले. भर गर्दीतही स्टेजवर तृतीयपंथींचा सिगरेटचा धूर काढत डॉल्बीच्या ठेक्यावर अश्लील नृत्याचा धिंगाणा सुरू होता.विशेष म्हणजे, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना राजर्षी छ. शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात धार्मिक कार्यक्रमांत अशा पद्धतीने धिंगाणा सुरू होता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी हा सारा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. पण, आज आमचा दिवस आहे, आम्हाला रोखायचे नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले. त्यामुळे पोलीसही हतबल झाल्याचे अनेकांनी सांगितले.

संयोजकांवर कारवाईची शिवसेनेची मागणी

पंचगंगा तालीम मंडळाच्या वतीने अशा धार्मिक सोहळ्यात छोटी वस्त्रे परिधान करून अश्लील हावभाव करीत तृतीयपंथीयांना नाचवले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर हा तृतीयपंथींचा नाच व व्यसनाधीन कार्यकर्त्यांचे कृत्य हिंदू धर्माच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे संयोजकांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे आदींच्या शिष्टमंडळाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांना दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransgenderट्रान्सजेंडरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस