४५० जागांसाठी आज पुनर्प्रवेश परीक्षा
By Admin | Updated: July 14, 2014 01:02 IST2014-07-14T00:47:50+5:302014-07-14T01:02:36+5:30
शिवाजी विद्यापीठ : प्रवेश फेरी होणार शनिवारी

४५० जागांसाठी आज पुनर्प्रवेश परीक्षा
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना निश्चित मर्यादेइतके गुण मिळाले नसल्याने शिवाजी विद्यापीठाच्या ९ अभ्यासक्रमांच्या ४५० जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमांची पुनर्प्रवेश परीक्षा उद्या, सोमवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेपाच यावेळेत मानव्यशास्त्र इमारतीमध्ये होणार आहेत.
विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंट विभागातील रिक्त राहिलेल्या एमएसडब्ल्यू, एमआरएस, एमसीए, एमबीए, एम.टेक या अभ्यासक्रमांच्या
१५० जागांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा होईल.
त्यात सकाळी नऊ ते साडेदहा यावेळेत या अभ्यासक्रमांची ‘पार्ट ए’ व ‘बी’ची, तर ‘पार्ट सी’ची सकाळी ११ ते दुपारी ३.४५ या वेळेत परीक्षा होणार आहे. विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालयांमधील एम.एस्सी., शेती रसायने व कीड व्यवस्थापन, एम. एस्सी. संगणकशास्त्र, एमसीए कॉमर्स, एम. ए. मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमांच्या ३०० जागांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमांची प्रवेश फेरी शनिवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता संबंधित विभागांमध्ये
होणार असल्याची माहिती
पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव विलास सोयम यांनी दिली. (प्रतिनिधी)