‘कृषी सन्मान’ची नोंदणी ३ लाखांवर, १२०९ गावांतील माहिती संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:43 IST2019-02-23T17:42:18+5:302019-02-23T17:43:25+5:30
कोल्हापूर : पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील सुमारे २ लाख ८२ हजार अर्जांची शनिवारी सकाळपर्यंत आॅनलाईनद्वारे नोंदणी झाली. दिवसभरात ...

केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी आॅनलाईनद्वारे माहिती संकलित केली जात आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आॅपरेटरांकडून डाटा भरण्याचे काम सुरू होते.
कोल्हापूर : पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील सुमारे २ लाख ८२ हजार अर्जांची शनिवारी सकाळपर्यंत आॅनलाईनद्वारे नोंदणी झाली. दिवसभरात यामध्ये वाढ होऊन जवळपास तीन लाखांवर हा आकडा गेला.
जिल्ह्यातील १२०९ गावांतील माहिती संकलित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात १० शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व तालुकास्तरावरही अशाच पद्धतीने कार्यक्रम घेतला जाणार आहे.
पंतप्रधान कृषी सन्मान योजनेकरिता आॅनलाईनद्वारे नोंदणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चौथ्या शनिवारी सुट्टीचा दिवस असूनही महसूलसह कृषी, सहकार व ग्रामविकास विभागाची यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयासह गावागावात कार्यरत होती.
शनिवारी सकाळपर्यंत २ लाख ८२ हजार जणांची नोंदणी आॅनलाईनद्वारे करण्यात आली. दिवसभरात हा आकडा सुमारे तीन लाखांवर गेला. यातील पात्र लाभार्थ्यांपैकी १० जणांना प्रातिनिधीक स्वरुपात आज, रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पेन्शनचे वितरण केले जाणार आहे.
सर्व तहसीलदार कार्यालयांच्या ठिकाणीही अशाच पद्धतीने कार्यक्रम घेऊन दहाजणांना पेन्शन दिली जाणार आहे. यानंतर आॅनलाईनद्वारे संकलित झालेल्या लाभार्थ्यांच्या माहितीची शहानिशा करून व वैधता तपासून पेन्शन संबंधितांच्या खात्यावर जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.