संबंधित डॉक्टरवर फौजदारी करण्याचे महापौरांचे आदेश ; ‘सावित्रीबाई फुले’त उपचारास दाखल करण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:14 IST2020-04-15T11:13:19+5:302020-04-15T11:14:56+5:30
बाळास काही झाल्यास जबाबदार नाही, त्यापेक्षा दुस-याच दवाखान्यात जावा, असा सल्ला दिला. यावर संबंधित डॉक्टरावर फौजदारी दाखल करण्यासाठी महापौर आजरेकर दोन तास रुग्णालयात थांबून होत्या.

संबंधित डॉक्टरवर फौजदारी करण्याचे महापौरांचे आदेश ; ‘सावित्रीबाई फुले’त उपचारास दाखल करण्यास टाळाटाळ
: संबंधित डॉक्टरवर फौजदारी करण्याचे महापौरांचे आदेश ; ‘सावित्रीबाई फुले’त उपचारास दाखल करण्यास टाळाटाळ
कोल्हापूर : प्रसूतीसाठी येणाऱ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये घडत आहे. सोमवारी (दि. १३) रात्री पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला. महापौर निलोफर आजरेकर यांनी पाठविलेल्या रुग्णाला दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. बाळास काही झाल्यास जबाबदार नाही, त्यापेक्षा दुस-याच दवाखान्यात जावा, असा सल्ला दिला. यावर संबंधित डॉक्टरावर फौजदारी दाखल करण्यासाठी महापौर आजरेकर दोन तास रुग्णालयात थांबून होत्या.
महापौर निलोफर आजरेकर यांनी एका रुग्णाला प्रसूतीसाठी सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल होण्यासाठी पाठविले. मात्र, संबंधित डॉक्टरने दाखल करण्याऐवजी ‘आमच्याकडे काही सुविधा नाहीत. तुम्ही सीपीआरमध्ये किंवा खासगी रुग्णालयात दाखल व्हा. बाळाला काही झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही,’ अशी भीती घातली.
यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. महापौर आजरेकर यांना याची माहिती लागताच त्या तत्काळ रुग्णालयात आल्या. संबंधित डॉक्टरांची त्यांनी तासभर खरडपट्टी केली. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही दिली. डॉक्टरांचा रुग्णांना खासगी दवाखान्यात पाठविण्यामागे नेमका काय उद्देश आहे, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
डॉक्टरच रुग्णांना दुसºया दवाखान्यात जाण्याचे सांगत आहेत. सोमवारी अर्धा तास रुग्णाला ताटकळत ठेवले. संबंधित डॉक्टरने खोटे कागदपत्र तयार करून रुग्ण उपचार घेत असल्याचे दाखवून नंतर पळून गेल्याचे सांगितले. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असून संबंधितावर फौजदारी करण्याचे आदेश दिले आहेत.
निलोफर आजरेकर, महापौर
------------------------------------------------------------------
घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती घेतली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांना अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. योग्य त्या प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल आयुक्तांकडे दिला जाईल.
- डॉ. दिलीप पाटील, आरोग्याधिकारी, महापालिका
------------------------------------- ---------------------------------------------