शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूरात बसचालकाकडून २४ गुन्ह्यांची ‘ई’ चलनद्वारे दंडाची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 7:07 PM

कोल्हापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या खासगी आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २३ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवडी (रा. कऱ्हाड, जि. सातारा) यांच्याकडून २४ गुन्ह्यांचा चार हजार ८०० रुपये दंड भरून घेतला. मंगळवारी सकाळी महापालिका माळकर सिग्नल चौकात ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.

ठळक मुद्देकोल्हापूरात बसचालकाकडून २४ गुन्ह्यांची ‘ई’ चलनद्वारे दंडाची वसुलीशहर वाहतूक शाखेची कारवाई : माळकर सिग्नल चौकातील प्रकार

कोल्हापूर : शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या खासगी आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २३ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवडी (रा. कऱ्हाड, जि. सातारा) यांच्याकडून २४ गुन्ह्यांचा चार हजार ८०० रुपये दंड भरून घेतला. मंगळवारी सकाळी महापालिका माळकर सिग्नल चौकात ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.कोल्हापूर, इचलकरंजी शहरात वाहतूक दंड भरून घेण्यासाठी ‘ई’ चलन मशीनचा वापर पोलिसांकडून केला जात आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, एकेरी मार्ग असतानाही विरोधी दिशेने वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट अशा नियमबाह्य वाहनधारकांच्या संबंधित दुचाकी, कारचा फोटो वाहतूक पोलीस मशीनद्वारे काढत आहेत.

वाहनचालकाने केलेल्या गुन्ह्याचे कलम टाकताच दंडाची रक्कम स्क्रीनवर दिसते. ही रक्कम वाहनधारकाकडून ए टी एम, डेबिट कार्ड वापरून आॅनलाईनद्वारे भरून घेतली जात आहे. एखाद्या व्यक्तीने देशभरात कितीवेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला, याची कुंडली या मशीनमध्ये पाहायला मिळते. अशाच प्रकारे मंगळवारी सकाळी खासगी आराम बस (एम. एच. ०४ जी. पी. २३५६) अंबाबाई दर्शनासाठी भाविक-पर्यटकांना घेऊन कोल्हापुरात आली.चालक नायकवडी याने बस थेट शिवाजी चौक माळकर सिग्नल चौकात नेली. बस रस्त्यावर आल्याने वाहनांची प्रचंड कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या बसचा नंबर मशीनवर सर्च केला असता, आतापर्यंत त्याने २३ वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार एकूण २४ गुन्ह्यांचा त्याच्याकडून दंड वसूल करून घेतला.आठ लाख ३६ हजार दंडाची वसुलीशहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०३६ वाहनधारकांवर महिन्याभरात कारवाई करून आठ लाख ३६ हजार रुपये दंडाची वसुली केली आहे. तसेच सहा महिन्यांंमध्ये १७६३ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यासाठी प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयास पाठविला आहे. शहरातील वाहतूक विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या १६००७ वाहनधारकांवर कारवाई केली. 

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर