Record on one of Sangalwadi in molestation case | विनयभंगप्रकरणी सांगलवाडीच्या एकावर नोंद

विनयभंगप्रकरणी सांगलवाडीच्या एकावर नोंद

पेठवडगाव : मोबाईलवरून अश्लील मेसेज पाठवून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रमोद रविचंद्र गोरे सांगलवाडी (ता. व जि. सांगली) असे गुन्हा नोंद झालेल्या सशंयिताचे नाव आहे. याबाबत प‌ीडित मुलीने वडगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी घडला होता. याची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : वडगाव परिसरातील एका गावातील मुलगी खासगी नोकरी करीत होती. दरम्यान, तिला मोबाईलवर काॅल करून अश्लील मेसेज व चॅटिंगचे व्हिडिओ चित्रीकरण केले. लग्न कर अन्यथा नातेवाइकांना सांगेन अशी धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ केला. अश्लील व्हिडिओ, फोटो, पाठवून बदनामी केली. तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक फौजदार दीपक पोळ करीत आहेत.

Web Title: Record on one of Sangalwadi in molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.