शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

प्रोत्साहनाच्या योजनांची शिफारस हाळवणकर समितीने करावी

By admin | Updated: November 18, 2014 01:00 IST

वस्त्रोद्योग प्रश्न : प्रकाश आवाडे यांची शिफारस; आज कोल्हापुरात बैठक होणार

इचलकरंजी : राज्यात शेती खालोखाल रोजगार देणारा वस्त्रोद्योग व्यवसाय आहे. म्हणून सूतनिर्मिती ते कापड उत्पादन आणि गारमेंट-नेटिंगला प्रोत्साहन मिळेल, असा शिफारस करणारा अहवाल आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने शासनाकडे द्यावा. किंबहुना राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने यंत्रमाग क्षेत्रासह वस्त्रोद्योगामध्ये आधुनिक तंत्र आणून निर्यातीत दर्जाच्या कपड्याची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहनात्मक योजना जाहीर करण्याचे प्रयत्न या समितीने करावेत, अशी अपेक्षा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली.राज्यातील वस्त्रोद्योगामधील सर्व घटकांचा अभ्यास करून वस्त्रोद्योग विषयक धोरण ठरविण्यासाठी शिफारस करण्याच्या उद्देशाने आमदार हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती शासनाने नेमली आहे. या समितीची बैठक उद्या, मंगळवारी कोल्हापूर येथे आयोजित केली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार बैठकीत माजी मंत्री आवाडे बोलत होते. केंद्र सरकारच्या टफस् योजनेप्रमाणे साध्या यंत्रमागाचे आधुनिकीकरण करणारी, बॅँकांच्या कर्जावर सात टक्के व्याजाची सवलत देणारी, एक रुपये ८० पैसे दराने वीज उपलब्ध करणारी, नवउद्योजकांना ३५ टक्के पॅकेजिंग इन्सेंटिव्ह देणारी, आदी शिफारशींचा समावेश या अहवालात असावा. तसेच कापडावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करणारा टेक्स्टाईल प्रोसेसिंग पार्क इचलकरंजीसह भिवंडी, मालेगाव येथेही उभा करण्यात यावा. इचलकरंजीचे रूपांतर टेक्स्टाईल हबमध्ये व्हावे, अशा प्रकारच्या शिफारशी समितीच्या अहवालात असाव्यात, असेही आवाडे म्हणाले.राज्याचे वस्त्रोद्योग खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, तर वस्त्रोद्योगाविषयी शिफारशी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार हाळवणकर आहेत. या दोघांचाही वस्त्रोद्योगामध्ये अभ्यास असल्याने वस्त्रोद्योगाच्या प्रोत्साहनाबरोबरच कामगार कल्याण मंडळाची स्थापना, कामगारांची घरकुले, विमा, कामगार प्रशिक्षण अशा शिफारशी या अहवालामध्ये केल्या जाव्यात, अशी अपेक्षा आवाडे यांनी व्यक्त केली. यावेळी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, अशोक आरगे, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हाळवणकरांची कालची भूमिका आज आवाडेंकडेयापूर्वी केंद्र व राज्यात कॉँग्रेसचे सरकार होते. तेव्हा आपण विरोधी पक्षाचा आमदार असल्याने आमदार फंडातील विकासकामांव्यतिरिक्त अन्य कामे करण्यासाठी मला मर्यादा पडतात, अशी भूमिका आमदार हाळवणकर घेत असत. नेमकी तशीच भूमिका आता माजी मंत्री आवाडे यांनी पत्रकार बैठकीत घोषित केली आणि वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी त्यांना आपण सर्व प्रकारचे सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.