Tauktae Cyclone Kolhapur : कोकणातील वादळग्रस्तांना 'रवळनाथ'कडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 14:13 IST2021-05-22T14:08:16+5:302021-05-22T14:13:03+5:30
Tauktae Cyclone Kolhapur : तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झालेल्या मालवण येथील सुनीलदत्त कांदळगावकर (कुंभारमाठ) आणि सागर मिशाळ( कोळंब ) या दोन कर्जदार सभासदांना श्री रवळनाथ को- ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आर्थिक मदत देण्यात आली.

मालवण येथे तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेले सुनीलदत्त कांदळकर यांना 'रवळनाथ'चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या हस्ते मदत देण्यात आली.यावेळी सी.ए. सागर तेली, प्राचार्य मनोहर गुरबे, विक्रम जांभेकर उपस्थित होते.
गडहिंग्लज : तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झालेल्या मालवण येथील सुनीलदत्त कांदळगावकर (कुंभारमाठ) आणि सागर मिशाळ( कोळंब ) या दोन कर्जदार सभासदांना श्री रवळनाथ को- ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आर्थिक मदत देण्यात आली.
आठवड्यापूर्वी तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे मालवण किनारपट्टीलगतच्या गावातील घरांवर झाडे पडून बागायतदार, मच्छीमार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्याची माहिती मिळताच 'श्री रवळनाथ'चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी तात्काळ धाव घेऊन आपल्या कर्जदार सभासदांना तात्काळ आर्थिक मदत केली .
यावेळी चौगुले म्हणाले,रवळनाथ ही घरांसाठी कर्ज देणारी संस्था आहे.त्यामुळे कर्तव्य भावनेतूनच चक्रीवादळाने नुकसान झालेल्या सभासदांना संस्थेतर्फे मदत दिली आहे. यावेळी कांदळगावकर व मिशाळ म्हणाले, चक्रीवादळी होवून आठवडा उलटला तरी कुणाकडूनही मदत मिळाली नव्हती.
'श्री रवळनाथ'कडूनच पहिली मदत मिळाली.त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. यावेळी कुडाळ शाखा सल्लागार आणि कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मनोहर गुरबे, सी.ए. सागर तेली , शाखाधिकारी विक्रम जांभेकर उपस्थित होते.
कौले उडाली,कलमे जमीनदोस्त !
कांदळगावकर यांच्या रिसॉर्टचे नेट वाहून गेले, घरावर झाड पडले तर मिशाळ यांच्या घराची कौले उडाली आणि फळझाडांची कलमे जमीनदोस्त झाली.त्यांना 'रवळनाथ'कडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली.