शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रेशनवर आता ३५ रुपये किलोने तूरडाळ : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांना पुढील महिन्यापासून लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 11:18 IST

रेशनवर आता ५५ ऐवजी ३५ रुपये किलो दराने तूरडाळ मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना पुढील महिन्यापासून डाळ उपलब्ध होणार आहे. रेशन दुकानदाराला एक किलोमागे चार रुपये कमिशनही देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेली तूरडाळ ग्राहकांना माफक दरात देण्याचा सरकारचा हा एक प्रयत्न आहे.

ठळक मुद्देरेशनवर आता ३५ रुपये किलोने तूरडाळ कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांना पुढील महिन्यापासून लाभ दुकानदाराला किलोमागे ४ रुपये कमिशन

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रेशनवर आता ५५ ऐवजी ३५ रुपये किलो दराने तूरडाळ मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना पुढील महिन्यापासून डाळ उपलब्ध होणार आहे. रेशन दुकानदाराला एक किलोमागे चार रुपये कमिशनही देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेली तूरडाळ ग्राहकांना माफक दरात देण्याचा सरकारचा हा एक प्रयत्न आहे.राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने तूरडाळ खरेदी केली आहे. कार्डधारकाला ही तूरडाळ रेशनवर यापूर्वी ५५ रुपये किलोने विक्री होत होती; परंतु कमीत कमी दरात ग्राहकाला डाळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने ५५ ऐवजी ३५ रुपये किलो दराने रेशनवर डाळीची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यात पुढील महिन्यापासून होणार आहे.

जिल्ह्याची तूरडाळीची मागणी ही ४ हजार १५७ क्विंटल इतकी आहे. ही मागणी मंजूर करण्यात आली आहे. मागणीनुसार मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून एक किलोच्या तूरडाळीचे पिशवीमध्ये पॅकिंग करून ते जिल्हा पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामांमध्ये यायला सुरुवात झाली आहे.

पहिल्या टप्प्यात शिरोळ व कागल या तालुक्यांसाठी प्रत्येकी १८० क्विंटल तूरडाळ प्राप्त झाली आहे. टप्प्याटप्प्याने महिनाअखेर सर्व तालुक्यांतील गोदामांमध्ये तूरडाळ प्राप्त होणार असून, जिल्ह्यातील १५७२ रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्नसुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना त्याची विक्री सुरू होणार आहे.

एक किलो तूरडाळीमागे चार रुपये कमिशन रेशन दुकानदाराला दिले जाणार आहे. रेशन दुकानदाराने आपले कमिशन वजा करून ३१ रुपये हे ग्रास प्रणालीद्वारे जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत महाराष्टÑ स्टेट को-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या बॅँक खात्यावर जमा करायचे आहेत.

जिल्ह्यासाठी मंजूर झालेली तूरडाळतालुका             मंजूर तूरडाळ (क्विंटल)कोल्हापूर              शहर ३००पन्हाळा                         ४००हातकणंगले                   ६७२शिरोळ                            ५९०कागल                            ३५०शाहूवाडी                        १५०गगनबावडा                     ५०भुदरगड                         १५०गडहिंग्लज                     १५०आजरा                           २००चंदगड                           १००राधानगरी                      ३२५

शासनाने रेशनवर ३५ रुपये किलो दराने तूरडाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागणीप्रमाणे तूरडाळ यायला सुरुवात झाली असून, पुढील महिन्यापासून जिल्ह्यातील रेशन ग्राहकांना ही डाळ उपलब्ध होणार आहे.- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर