वाशिम जिल्ह्यातील रेशन दुकानांवर तूरडाळ विक्रीला अल्प प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 06:45 PM2018-05-12T18:45:04+5:302018-05-12T18:45:04+5:30

शिधापत्रिकाधारकांकडून तूरडाळ खरेदीला अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने दुकानदार जोखीम न पत्करता मागणीचा विचार करूनच तूरडाळीची उचल करीत आहेत.

Less response to sale of tooradal at ration shops in Washim district | वाशिम जिल्ह्यातील रेशन दुकानांवर तूरडाळ विक्रीला अल्प प्रतिसाद 

वाशिम जिल्ह्यातील रेशन दुकानांवर तूरडाळ विक्रीला अल्प प्रतिसाद 

Next
ठळक मुद्दे स्वस्तधान्य दुकानदारांना पुरवठा विभागामार्फत प्रति १ किलोच्या पाकिटातून मागणीनुसार तूर पुरविली जात असून, यात घट येण्याचीही शक्यता नाही.स्वस्तधान्य दुकानांत तूरडाळ शिजण्यास अवघड असून, चवीलाही चांगली नसल्याचे शिधापत्रिकाधारकांचे मत आहे.

वाशिम: शासनाच्या विविध योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई करून ती स्वस्तधान्य दुकानांतील तूरडाळ विक्रीला प्रतिसाद वाढावा म्हणून शासनाने स्वस्तधान्य दुकानदारांचे कमीशन वाढविले असले तरी, शिधापत्रिकाधारकांकडून तूरडाळ खरेदीला अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने दुकानदार जोखीम न पत्करता मागणीचा विचार करूनच तूरडाळीची उचल करीत आहेत.
राज्य शासनाने गत तीन वर्षांत शासकीय योजनेंतर्गत लाखो मेट्रिक टन तूर खरेदी केली; परंतु बाजारात तुरीचे भाव पडल्याने ही तूर विकणे अडचणीचे झाले होते. त्यामुळे शासकीय योजनेंतर्गत खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून निघणारी तूरडाळ स्वस्तधान्य दुकानांमधून विकण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, शासनाकडून या डाळ विक्रीसाठीही इतर धान्याप्रमाणेच स्वस्तधान्य दुकानदारांना ७० पैसे ते १.५० रुपयापर्यंत प्रतिकिलो कमीशन देण्यात येत होते. त्यामुळे या तूरडाळ विक्रीला प्रतिसाद मिळेनासा झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तूरडाळ विक्री वाढविण्यासाठी स्वस्तधान्य दुकानदारांचे कमीशन दुप्पट केले. या निर्णयानुसार पॉस मशीनवर तूरडाळ विकणाºया दुकानदारांना १.५० रुपयांवरून ३.०० रुपये, तर पॉस मशीनविना तूर विकणाºया दुकानदारांना १.५० पैसे कमीशन देण्यात येत आहे. स्वस्तधान्य दुकानदारांना पुरवठा विभागामार्फत प्रति १ किलोच्या पाकिटातून मागणीनुसार तूर पुरविली जात असून, यात घट येण्याचीही शक्यता नाही. तथापि, शिधापत्रिकाधारकांचा या तूरडाळ खरेदीस अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने स्वस्तधान्य दुकानदार जोखीम न पत्करता मोजक्याच तूर डाळीची उचल पुरवठा विभागाकडून करीत आहेत. त्यामुळे स्वस्तधान्य दुकानदारांचे कमीशन वाढवूनही तूरडाळ विक्रीचे प्रमाण मात्र वाढलेच नसल्याचे स्पष्ट होत आहे. 
 
डाळीचा दर्जा व दराचा परिणाम
स्वस्तधान्य दुकानांत शासनाकडून भरडाई केलेली विकल्या जात असलेली तूरडाळ शिजण्यास अवघड असून, चवीलाही चांगली नसल्याचे शिधापत्रिकाधारकांचे मत आहे. त्यामुळे आधीच या तूरडाळ खरेदीबाबत शिधापत्रिकाधारक अनुत्साही आहेत. त्यातच बाजारात मिळणाºया तुरडाळीचे दर आणि स्वस्तधान्य दुकानांत विकल्या जाणाºया तुरडाळीच्या दरात दर्जाचा विचार करता फारसा फरक नसल्याने शिधापत्रिकाधारक स्वस्तधान्य दुकानांत मिळणारी डाळ घेण्यात उत्साही नसल्याचे दिसत आहे. 
 

शासनाकडून भरडाई केलेली तूरडाळ आम्ही स्वस्तधान्य दुकानांत विकत आहोत. यामध्ये घट येत नसल्याने आमचे नुकसानही नाही; परंतु ही तूरडाळ शिजत नसल्याचे काहींचे मत आहे. आम्ही मागणीचा विचार करूनच या तुरडाळीची उचल करून ती विकत आहोत. 
-तानाजीराव काळे,जिल्हाध्यक्ष, स्वस्तधान्य दुकानदार संघ

Web Title: Less response to sale of tooradal at ration shops in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम