भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही

By दीपक भातुसे | Published: May 3, 2024 08:51 AM2024-05-03T08:51:21+5:302024-05-03T08:55:35+5:30

काँग्रेस विरुद्ध अजित पवार गट

lok sabha election 2024 bjp congress shiv sena Lok Sabha elections in the state fixed | भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही

भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही

नजीर शेख/ दीपक भातुसे

छत्रपती संभाजीनगर/ मुंबई : लोकसभा निवडणुकीचे राज्यातील एकूण ४८ मतदारसंघांतील लढतींचे चित्र मतदानाचे दोन टप्पे पार पडल्यानंतर स्पष्ट झाले आहे. राज्यात १५ मतदारसंघांत भाजपची लढत काँग्रेसशी होणार आहे, तर उद्धवसेना आणि शिंदेसेनेत १३ जागांवर संघर्ष पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि अजित पवार गट यांचा तसेच शरद पवार गट आणि शिंदेसेनेचा एकाही मतदारसंघात मुकाबला नाही.

महाविकास आघाडीमध्ये उद्धवसेना २१ जागा लढत आहे, तर महायुतीमध्ये शिंदेसेनेने १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

राज्यातील लढतीचे चित्र

उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना - १३ मतदारसंघ - मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, ठाणे, कल्याण, हातकणंगले, मावळ, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली

उद्धवसेना विरुद्ध भाजप - ५ मतदारसंघ - मुंबई उत्तर पूर्व, पालघर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव

उद्धवसेना विरुद्ध अजित पवार गट - २ मतदारसंघ - उस्मानाबाद, रायगड

उद्धवसेना विरुद्ध रासप - १ मतदारसंघ – परभणी

शरद पवार गट विरुद्ध भाजप - ८ मतदारसंघ - भिवंडी, सातारा, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, वर्धा, बीड

शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट -

२ मतदारसंघ - बारामती, शिरूर

शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेना – ००

काँग्रेस विरुद्ध भाजप - १५ मतदारसंघ - मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, सोलापूर, पुणे, नंदुरबार, धुळे, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, जालना

काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना - २ मतदारसंघ - कोल्हापूर, रामटेक

काँग्रेस विरुद्ध अजित पवार गट – ००

पालघर भाजपकडे, डॉ. हेमंत सावरांना दिले तिकीट  

राज्यातील लोकसभेच्या तीन टप्प्यांचे मतदान शिल्लक आहे. तीन टप्प्यांत ३५ मतदारसंघांत मतदान होणार आहे.

अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना भाजपने पालघरसाठी उमेदवार जाहीर केला. डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना भाजपने तिकीट दिले आहे. हा मतदारसंघ शिंदेसेनेकडे जातो की भाजपकडे याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. उद्धवसेनेकडून भारती कामडी पालघरमधून रिंगणात आहेत.

शिंदेसेनेची सर्व शक्ती ठाकरेंविरुद्ध

शिंदेसेनेचे सुमारे ८५ टक्के उमेदवार उद्धवसेनेशी लढत आहेत. शिंदेसेनेची शक्ती ठाकरेंविरुद्ध खर्ची पडत आहे. ज्या राष्ट्रवादीविरुद्ध शिंदेसेनेने फुटीआधी रान उठविले होते, त्याविरुद्ध एकही उमेदवार नाही.

किती ठिकाणी होतेय भाजप-काँग्रेस लढत?

भाजप काँग्रेसविरुद्ध लढत असलेल्या १५ जागांपैकी सहा जागा या विदर्भातील आहेत. विदर्भात एकूण १० जागा आहेत. त्याखालोखाल भाजप मराठवाड्यात तीन, तर पश्चिम महाराष्ट्र व मुंबईत दोन ठिकाणी काँग्रेसशी झुंजणार आहे.

Web Title: lok sabha election 2024 bjp congress shiv sena Lok Sabha elections in the state fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.