अब्दुललाटमध्ये ग्रामस्थांकडून रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:00+5:302021-04-14T04:21:00+5:30
अब्दुललाट : मोकाट घोड्यांचा बंदोबस्त करा, या मागणीसाठी अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे मंगळवारी सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

अब्दुललाटमध्ये ग्रामस्थांकडून रास्तारोको
अब्दुललाट : मोकाट घोड्यांचा बंदोबस्त करा, या मागणीसाठी अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे मंगळवारी सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कुरुंदवाड पोेलिसांनी घटनास्थळी येऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून या परिसरात मोकाट घोड्यांचा वावर सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मध्यंतरी घोडेमालकावर ग्रामपंचायतीकडून जुजबी कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा घोड्यांचा वावर सुरू झाला आहे.
मंगळवारी शांताबाई कल्लाप्पा गुरव, राणोजी लक्ष्मणा पुजारी व लक्ष्मण तिप्पा पुजारी हे देवदर्शनासाठी जात होते. यावेळी पिसाळलेल्या घोड्याने या तिघांचा चावा घेऊन जखमी केले. जखमी लक्ष्मण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन गावातील घोडेमालक आहेत, त्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांकडून ही कारवाई दिवसभर सुरू होती. पकडण्यात आलेली घोडे ग्रामपंचायत परिसरात बांधण्यात आले. आंदोलनात मिलिंद कुरणे, कल्लाप्पा कुमटोळे, पायगोंडा पाटील, संजय परीट, सागर सांगावे, मारूती मोहिते यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
फोटो - १३०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे मोकाट घोड्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीप्रश्नी ग्रामस्थांच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.