शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

बाबूराव पेंटर यांची दुर्मीळ चित्रफीत फिल्म आर्काइव्हजला सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी १९१८ साली त्यांनी बनवलेल्या कॅमेऱ्यावर चित्रित केलेली दुर्मीळ चित्रफीत ...

कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी १९१८ साली त्यांनी बनवलेल्या कॅमेऱ्यावर चित्रित केलेली दुर्मीळ चित्रफीत महाराष्ट्र चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे पंत अमात्य बालविकास ट्रस्टचे उपाध्यक्ष नीलराजे बावडेकर यांनी सुपूर्द केली. यावेळी फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट उपस्थित होते.

पेंटर यांना जेव्हा ब्रिटिश कंपनीने कॅमेरा देण्याचे नाकारले तेव्हा त्यांनी १९१८ साली स्वत:चा कॅमेरा बनवला. चाचणीसाठी त्यांनी अनेक ठिकाणी चित्रीकरण केले. त्यापैकी काही चित्रीकरण त्यांनी गगनबावडा जहागिरीत केले. या चित्रीकरणात गगनबावड्याचे तत्कालीन जहागीरदार माधवराव अमात्य बावडेकर यांच्या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले. यावेळी युवराज परशुराम अमात्य बावडेकर हेदेखील उपस्थित होते. १९३३ सालीही त्यांनी पुन्हा एकदा गगनबावडा येथील राजवाड्यातील रामनवमी आणि परशुराम अमात्य बावडेकर यांची दिनचर्या, पळसंबे येथील वाड्याचे बांधकाम याचे चित्रीकरण केले होते.

२००२२०२१ कोल बाबूराव पेंटर

बाबूराव पेंटर यांनी चित्रित केलेली दुर्मीळ चित्रफीत नीलराजे बावडेकर यांनी प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी दिलीप बापट उपस्थित होते.