राधानगरी धरणच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ; तुफान पाऊस सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 19:41 IST2023-07-23T19:41:23+5:302023-07-23T19:41:44+5:30
काल रात्री पासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सात स्वयंचलित दरवाज्याजवळ पाणी लागले असून, पावसाचा जोर आणखी वाढल्यास पाच ते सात दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची क्षकता आहे.

राधानगरी धरणच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ; तुफान पाऊस सुरूच
लोकमत न्यू नेटवर्क
राधानगरी : राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. काल रात्री पासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सात स्वयंचलित दरवाज्याजवळ पाणी लागले असून, पावसाचा जोर आणखी वाढल्यास पाच ते सात दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची क्षकता आहे.
आज दुपारी चार पर्यत ७० मी. मी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १९९० मी. मी नोंद करण्यात आली आहे. पाणी पातळी ३४०. ५० फूट व पाणीसाठा ७०८३. ७५ द. ल. घ. फू(६.७८ टी एम सी) इतका आहे. ८५.०२ टक्के धरण भरले असून. खासगी जलविद्युत केंद्रातून १४०० क्यूसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.