शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आंतरजातीय विवाह केला, बहिष्कार मागे घेण्यासाठी मागितली खंडणी; नंदीवाले समाजाच्या चौघांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 17:01 IST

हातकणंगले : दलित समाजातील मुलीशी लग्न केल्याने नंदीवाले समाजातून बहिष्कृत केलेल्या हातकणंगले येथील जोडप्याला पुन्हा समाजात घेण्यासाठी ५० हजार ...

हातकणंगले : दलित समाजातील मुलीशी लग्न केल्याने नंदीवाले समाजातून बहिष्कृत केलेल्या हातकणंगले येथील जोडप्याला पुन्हा समाजात घेण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी जातपंचायतीचा म्होरक्या लक्ष्मण राजाराम जाधव, त्यांचा मुलगा महादेव, दोघे रा.ढवळी, ता. वाळवा, जि.सांगली, लक्ष्मण नंदीवाले, रा. दानोळी, ता. शिरोळ, पांडुरंग नंदीवाले, रा.मंगोबा मंदिर कोथळी, ता.शिरोळ, या चौघांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध निवारण अधिनियम कायद्यान्वये हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची वर्दी संजय संभाजी नंदीवाले, रा. शाहूनगर हातकणंगले यांनी दिली आहे.           या गुन्ह्याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, संजय नंदीवाले यांचा चुलत भाऊ सुनील वसंत नंदीवाले याने नृसिंहवाडी येथे १३ / ११ / २०२१ रोजी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांची पत्नी दलित समाजातील असल्याने नंदीवाले समाजाचा प्रमुख लक्ष्मण जाधव याने आपला मुलगा महादेव तसेच लक्ष्मण नंदीवाले (दानोळी ) पांडुरंग नंदीवाले ( कोथळी ) यांच्या मदतीने जात पंचायत भरवून सुनील आणि त्यांच्या कुटुंबाला लग्न झाल्यापासून गेली तीन वर्षे समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यास बहिष्कृत केले होते. संजय नंदीवाले याने जात पंचायतीच्या म्होरक्यासह सर्वांची भेठगाठ घेऊन चुलत भाऊ सुनील यांच्या कुटुंबावर घातलेला समाजाचा बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती केली होती.           जातपंचायतीच्या वरील चार प्रमुखांनी सुनील आणि त्यांच्या कुटुंबावरील समाजाचा बहिष्कार मागे घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. संजय नंदीवाले याने वरील चौघांविरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस