रंग बरसे... सखी सदस्यांसाठी रंगपंचमी सखी मंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 13:14 IST2019-03-21T13:10:18+5:302019-03-21T13:14:23+5:30

रंगांचा उत्सव रंगपंचमी, या दिवशी सगळे हेवेदावे विसरून आपण रंगांची उधळण करतो आणि मैत्रीचे नाते घट्ट करतो. सखी सदस्य ही चक्क एक दिवस आधी रंगपंचमीचा उत्सव साजरा करणार आहे. हा कार्यक्रम रविवार २४ मार्च २०१९ रोजी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे सकाळी ११ ते चार या वेळेत होणार आहे.

Rang Barchini ... colorful forums | रंग बरसे... सखी सदस्यांसाठी रंगपंचमी सखी मंच

रंग बरसे... सखी सदस्यांसाठी रंगपंचमी सखी मंच

ठळक मुद्देरंग बरसे... सखी सदस्यांसाठी रंगपंचमी सखी मंचलोकमत सखी मंचचे आयोजन

कोल्हापूर : रंगांचा उत्सव रंगपंचमी, या दिवशी सगळे हेवेदावे विसरून आपण रंगांची उधळण करतो आणि मैत्रीचे नाते घट्ट करतो. सखी सदस्य ही चक्क एक दिवस आधी रंगपंचमीचा उत्सव साजरा करणार आहे. हा कार्यक्रम रविवार २४ मार्च २०१९ रोजी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे सकाळी ११ ते चार या वेळेत होणार आहे.

सखी मंचसाठी नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. सण-समारंभ यांचे निमित्त साधून आपल्या परंपरा जपण्याचा प्रयत्न सखी मंच करत असते. २४ मार्च रोजी सगळ्या सख्यांसाठी रोजच्या धावपळीच्या रुटीनमधून थोडावेळ स्वत:साठी जगण्यासाठी हा कार्यक्रम आहे. सगळे टेन्शन विसरून सखी एकत्र येणार आणि धम्माल करणार आहेत.

या ठिकाणी वॉटर गेम्स, रेन डान्स, कोरड्या रंगांची रंगपंचमी अल्पोपहार आणि धमाल डीजेसोबत ही रंगपंचमी साजरी होणार आहे. सर्व सखींनी कार्यक्रमासाठी पांढरा पोशाख परिधान करावा. सखी सदस्यांसाठी नाममात्र १६० रु. शुल्क, तर इतर महिलांसाठी २५० रु. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी १६० रु. आकारले जातील.

या कार्यक्रमाचे पासेस लोकमत कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत उपलब्ध आहेत. मर्यादित पास असल्याने लवकरात लवकर आपले पास न्यावेत. अधिक माहितीसाठी ७९७२३९२०२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. पासेस नेण्यासाठी गुरुवार २१ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत यावे.

 

 

Web Title: Rang Barchini ... colorful forums