शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

अवेळी पाणीपुरवठ्याने ‘रमणमळा’ हैराण

By admin | Updated: March 9, 2015 23:44 IST

जलतरण तलाव बंद : नव्याने विकसित होणाऱ्या कॉलन्यांमध्ये निधीअभावी विकासकामांवर मर्यादा

रमणमळा प्रभागात न्यू पॅलेस, कसबेकर पार्क, बेडेकर मळा, नाईक मळा, उदयसिंह नगर, छत्रपती पार्क, महावीर कॉलेज, आदी परिसरासह १६ लहान-मोठ्या नवीन विकसित झालेल्या कॉलन्यांसह शेतीचा काही भाग येतो. प्रभागात रस्ते, गटारी, रस्त्यावरील दिवे यांची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. परंतु, प्रभागात पहाटे ३ ते ६ या वेळेत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त आहेत. त्याचप्रमाणे जलतरण तलावही अनेक महिने बंद अवस्थेत आहे. प्रभागात नगरसेवकांचा संपर्क चांगला आहे. प्रभागाचा विस्तार महावीर कॉलेजपासून ते बावड्यातील शाहू जन्मस्थळापर्यंत असा विस्तीर्ण आहे. न्यू पॅलेस परिसरात विकसित झालेल्या नवीन कॉलन्या आणि शिंदे मळा, पोवार मळा, नाईक मळा, आदी ठिकाणी शेतात प्लॉट पाडून विकसित झालेल्या कॉलन्यांमुळे रस्ते व गटारी करण्यात निधीअभावी मर्यादा आल्या आहेत. तरीही शक्य तिथले रस्ते करण्याचा नगरसेवकांनी प्रयत्न केला आहे. प्रभागात उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी लोकांचा समावेश आहे.प्रभागात मुख्य समस्या आहे ती अवेळी येणाऱ्या पाण्याची. पहाटे ३ ते ६ या वेळेत पाणी येते. पाण्याची ही वेळ बदलून मिळावी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासाठी प्रभागात रास्ता रोकोही झाला. नगरसेवकांकडे लेखी तक्रार केली, महापालिकेला कळवले. परंतु, पाण्याच्या वेळेत बदल झालेला नाही. नगरसेवकांनीही पाण्याची वेळ बदलून मिळावी, तसेच जास्त दाबाने पाणी सोडावे, यासाठी प्रयत्न केले. परंतु, काही फरक पडलेला नाही. संतप्त नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना वारंवार तोंड द्यावे लागते. पाण्याची वेळ बदलून मिळण्यासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.प्रभागात महापालिकेचा जलतरण तलाव आहे. या तलावामुळे परिसरातील लोकांना सुविधा होत होती. परंतु, दुरवस्था झाल्याने गेली काही महिने हा तलाव बंद आहे. सध्या तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे अजून काही दिवस तलाव बंद राहणार आहे. प्रभागात नगरोत्थानमधून महावीर कॉलेज ते न्यू पॅलेस सोसायटीपर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. मात्र, रेणुका मंदिर ते शाहू जन्मस्थळ या एक कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम अद्याप सुरू नाही.सध्या प्रभागात ‘छत्रपती पार्क’ गार्डनचे काम सुरू आहे. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण होणार आहे. गार्डनचे काम पूर्ण झाल्यानंतर गार्डनच्या शेजारील जागा विकसित करण्यात येणार आहे. त्याचेही काही ठिकाणी काम सुरू आहे. प्रभागात आतापर्यंत तीन कोटी ७५ लाख रुपयांची विकासकामे केली. त्यासाठी मालोजीराजे छत्रपती आणि महापालिका यांच्याकडून निधी उपलब्ध झाला. यामध्ये प्रामुख्याने भागातील रस्ते, गटारी केल्या. तसेच छत्रपती पार्क गार्डनसाठी ४० लाख रुपये, तर जलतरण तलावासाठी ११ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले. जलतरण तलावासाठी अद्याप १० लाख रुपये खर्च करावयाचा आहे. - राजाराम गणपती गायकवाड, नगरसेवक