शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

शासनाने ऊस दर नियंत्रण मंडळ केले दुबळे, ऊस उत्पादकांसाठी लढणाऱ्यांनाच दिला डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 14:16 IST

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रघुनाथ पाटील यांना ऊस दर नियंत्रण मंडळातून वगळले

कोल्हापूर : ऊस उत्पादकांसाठी लढा उभारणारे माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि रघुनाथ पाटील यांनाच ऊस दर नियंत्रण मंडळातून वगळण्यात आले आहे. शासनाने बुधवारी नव्या अशासकीय सदस्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. शासनकर्त्यांना प्रश्न विचारतील, जाब विचारतील अशा लोकांना या समितीवर न घेता शेतकऱ्यांपेक्षा सरकारच्या हो ला हो म्हणतील असेच लोक समितीवर घेतल्याची टीका सुरू झाली आहे. पृथ्वीराज जाचक व प्रशांत परिचारक हेच या उद्योगाचा अभ्यास असणारे प्रतिनिधी आहेत.गेल्या वर्षी सत्तांतर झाल्यानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी ऊस दर नियंत्रण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. लवकरात लवकर या नियुक्त्या कराव्यात यासाठी शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी संघटनांचे नेते आग्रही होते. त्यानुसार आता ही नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नव्या सदस्यांमध्ये शेतकरी प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ खोत यांच्या संघटनेचे सुहास पाटील - माढा, सचिनकुमार नलवडे - कराड, स्वाभिमानी संघटनेचे पृथ्वीराज जाचक - इंदापूर, धनंजय भोसले - औसा, योगेश बर्डे - दिंडोरी यांचा समावेश करण्यात आला आहे.सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत परिचारक, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास तांबे यांचा तर खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाचे संचालक दामोदर नवपुते, मानस ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक आनंदराव राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे. बहुतांशी सदस्य हे भाजपशी संबंधित आहेत.

हा तर शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्नचळवळीतील नेत्यांना वगळून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. ते म्हणाले, गेल्या साखर हंगामात गाळपापोटी साखर कारखानदारांकडे जादा पैसे जमा झाले आहेत. हे पैसे देण्याची आम्ही सातत्याने मागणी करीत होतो. त्यामुळेच हे नियंत्रण ठेवणारे मंडळच कमकुवत करण्यासाठी आम्हाला वगळण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधीच नाहीतकोल्हापूर, सांगली जिल्ह्यात उसाचे मोठे उत्पादन आहे. राज्यातील साखर कारखानदारीत या विभागाचा ३० टक्के वाटा आहे. सहकारी आणि खासगी असे ४० हून अधिक साखर कारखाने येथे आहेत. असे असले तरी या दोन्ही जिल्ह्यांतील कोणाचाही समावेश या समितीत करण्यात आलेला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Sugar factoryसाखर कारखाने