“किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:03 PM2021-09-24T16:03:48+5:302021-09-24T16:05:26+5:30

भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत.

raju shetti challenge kirit somaiya to open corruption in mumbai bank | “किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

“किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

Next

कोल्हापूर: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, किरीट सोमय्या यांच्यात हिंमत असेल, तर मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा, असे आव्हान दिले आहे. (raju shetti challenge kirit somaiya to open corruption in mumbai bank)

“देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करत ‘तो’ निर्णय थांबवण्यास भाग पाडणार का?” 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, महापूर येऊन दोन महिने उलटले. अजूनही शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना सरकारची मदत मिळाली नाही. लवकरात लवकर ही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. 

“तुम्ही हजार वर्ष सत्ता राखा, पण राज्यातील महिला...”; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका

नागरिकांची थांबण्याची मानसिकता राहिलेली नाही

आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांची थांबण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे देणार की नाही, तसेच देणार असाल तर कधी देणार, किती देणार हे जाहीर करा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली. याशिवाय आठ दिवसांत मदत न मिळाल्यास मंत्र्यांना भागात फिरणे मुश्कील करू, त्यांच्या गाड्या अडवू,असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

“आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल

गैरव्यवहार बाहेर काढताना भेदभाव कधीच केला नाही

आम्ही साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढताना प्रांत, पक्ष असा भेदभाव कधीच केला नाही. देशातील सर्व राज्यातील साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढला. सोमय्या मात्र विशिष्ट पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मागे लागले आहेत. विशिष्ट नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

“अनंत गीतेंचे म्हणणे १०० टक्के खरे, शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही”

दरम्यान, मुंबै बँकेवरील आरोप आता गुळगुळीत झाले आहेत. मुंबै जिल्हा बँकेविरुद्ध यापूर्वीच सहकार कायद्याच्या अंतर्गत चौकशी झाली. त्याचा कम्पलायन्स अहवाल दिला आहे. तो अहवाल सहकार खात्याने स्वीकारला. यासंदर्भात जो खटला होता, तो सी समरी म्हणून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकांविरोधात ईडी, सीबीआय आणि केंद्र सरकारकडे तक्रार करणार आहे. तसेच मुंबै बँक ही एकट्या दरेकरांची नाही. यात राष्ट्रवादीचे सहा संचालक आहेत. यात शिवाजीराव नलावडे, अजित पवार यांचे जवळचे सहकारी सिद्धार्थ कांबळे या बँकेत आहेत. सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर हेही आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. 
 

Web Title: raju shetti challenge kirit somaiya to open corruption in mumbai bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app