“देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करत ‘तो’ निर्णय थांबवण्यास भाग पाडणार का?” 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:11 PM2021-09-24T12:11:58+5:302021-09-24T12:14:04+5:30

महाविकास आघाडीत सहभागी असलेली काँग्रेस सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहे.

congress sachin sawant criticised bjp devendra fadnavis and modi govt on soymeal import | “देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करत ‘तो’ निर्णय थांबवण्यास भाग पाडणार का?” 

“देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करत ‘तो’ निर्णय थांबवण्यास भाग पाडणार का?” 

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हे मोदी सरकारचे धोरणदेवेंद्र फडणवीसजी मोदी सरकारचा निषेध करणार काकाँग्रेसचा थेट सवाल

मुंबई: कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, महागाई, इंधनदरवाढ, गॅसचा वाढलेला भाव यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत सहभागी असलेली काँग्रेस सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. यासंदर्भात काँग्रेसने देशभरात मोर्चे, आंदोलनही केले. यातच आता सोयामील आयातीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने निशाणा साधला असून, देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करत सोयामील आयातीचा निर्णय थांबवण्यास भाग पाडणार का, अशी रोखठोक विचारणा केली आहे. (congress sachin sawant criticised bjp devendra fadnavis and modi govt on soymeal import)

What a hero! केविन पीटरसनची PM मोदींवर स्तुतिसुमने; पाहा, नेमकं कारण

केंद्र सरकारने बारा लाख टन सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि आयात सोयामील एकाच वेळी बाजारात पोहचणार असल्याने सोयाबीनच्या भावावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यातील भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 

“कोरोना काळात भारताने केले, ते अन्य कुणीही करु शकला नाही”; SC ने केले मोदी सरकारचे कौतुक

शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हे मोदी सरकारचे धोरण

सोयाबीनचे भाव सातत्याने पडत आहेत. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने १२ लाख टन सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. डाळींबाबतही मोझांबिकसारख्या देशांना फायदा व्हावा याकरिता मोदी सरकारने करार केला होता. शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हेच मोदी सरकारचे धोरण आहे. एकेकाळी शेतकरी दिंडी काढून चिपळ्या वाजवत शेतकऱ्यांची कणव आहे असे दाखवून सोयाबीनला भाव मागणारे देवेंद्र फडणवीसजी मोदी सरकारचा निषेध करणार का? सोयामील आयातीचा निर्णय थांबवण्यास मोदींना भाग पाडणार का?, असा सवाल सचिन सावंत यांनी ट्विट करत केला आहे. 

अबब! OYO Hotels तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत; गुंतवणुकीची सुवर्ण संधी

“तुम्ही हजार वर्ष सत्ता राखा, पण राज्यातील महिला...”; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका

दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयाबीन बाजारात दाखल होण्याची वेळ आली असतानाच भाव घसरल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा, खानदेशात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला मुसळधार पावसाने झोपडले आहे. त्यामुळे काढणीस आलेले सोयाबीनचे पीक धोक्यात आहे. निसर्गाचा लहरीपणा, लागवड खर्चात भरमसाठ वाढ आणि बाजारात गडगडलेले सोयाबीनचे दर यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे.
 

Web Title: congress sachin sawant criticised bjp devendra fadnavis and modi govt on soymeal import

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.