शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

‘कोल्हापूर दक्षिण’मधून कोण कसा निवडून येतो, तेच बघतो; राजेश क्षीरसागरांचे सतेज पाटीलांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:58 IST

खंडपीठ झाल्याशिवाय निवडणुकांना सामोरे जाणार नाही

कोल्हापूर : सत्तेवर असताना कामे करायची नाहीत आणि पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकायच्या, जनतेत गैरसमज पसरवण्याचा उद्योग काहीजण करत आहेत. अजून आम्ही ‘अटॅक’ केलेला नाही, ज्यावेळी करू त्यावेळी पळताभुई थोडी होईल, असा इशारा देत कोट्यवधी रुपयांची विकासकामे जिल्ह्यात सुरू असल्याने आगामी निवडणुकीत दोन खासदार आणि दहा आमदार महायुतीचे निवडून आणणारच, मग ‘कोल्हापूर दक्षिण’मधून कोण कसा निवडून येतो, तेच बघतो, असे थेट आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता रविवारी पत्रकार परिषदेत दिले.राजेश क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात विकासकामांचा धडाका लावला आहे. अद्ययावत फुटबॉल मैदानासाठी शेंडा पार्क येथे २० एकर जागा निश्चित केली असून, आर्किटेक्टची नेमणूकही केली आहे. शहरातील कामांचे श्रेय काहीजण घेत आहेत; पण कागदे दाखवून निधी येत नाही. दिवसभर बसून आणावा लागतो. राधानगरी येथे सैनिक स्कूल करणार आहे. ठाण्यानंतर शिवसेनेची कोल्हापुरात अधिक ताकद आहे. खंडपीठासह जनहिताचे निर्णय झाल्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार नसून कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा पहिला महापौर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, त्यासाठी प्रसंगी आर या पारची लढाई करावी लागली तरी बेहत्तर.

‘व्ही. बी.’ संधी साधूव्ही. बी. पाटील हे व्यवसायातून राजकारणात आलेले आहेत, ते कोल्हापूरच्या कोणत्या जनआंदोलनात होते? ते संधी साधू राजकारणी असल्याची टीका क्षीरसागर यांनी केली.

कनव्हेशन सेंटरला वाढीव २४३ कोटीला मंजुरी

येथील उद्योजकांसह कलाप्रेमींची मागणीनुसार येथे १०० कोटींचे कनव्हेशन सेंटर उभा राहत आहे. त्यालाही काही जणांनी विरोध केला; पण ते काम थांबणार नाही उलट विस्तारीकरणासाठी २४३ कोटी निधीस मान्यता दिली असून, १५ दिवसांत त्याच टेंडर निघेल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.अंबाबाई मंदिर ड्रेनेजसाठी अडीच कोटीअंबाबाई मंदिरात घाटी दरवाजा व विद्यापीठ हायस्कूलकडून येताना घाण वास येतो. मात्र, यापूर्वी अनेकजण पालकमंत्री झाले, त्यांना तो आला नाही, ते अंबाबाईजवळ जाऊन नुसते पैसे मागत होते. ड्रेनेज लाइनसाठी जिल्हा नियोजनमधून आम्ही अडीच कोटी रुपये मंजूर केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील