राजेश क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही, गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंनी पोलीस अधीक्षकांना खडसावले  

By पोपट केशव पवार | Published: February 8, 2024 03:25 PM2024-02-08T15:25:17+5:302024-02-08T15:26:07+5:30

कोल्हापूर : 'राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनंतरही राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही? कोण आहे हा राजेश ...

Rajendra Varpe was beaten up by Rajesh Kshirsagar, Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve scolded Kolhapur Superintendent of Police Mahendra Pandit on Thursday | राजेश क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही, गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंनी पोलीस अधीक्षकांना खडसावले  

राजेश क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही, गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंनी पोलीस अधीक्षकांना खडसावले  

कोल्हापूर : 'राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनंतरही राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही? कोण आहे हा राजेश क्षीरसागर ?, त्याच्या बापाची जहागीर आहे का ? गुन्हा रजिस्टर का नाही ? लगेच कारवाई झाली पाहिजे, पोलिसांची आणि क्षीरसागरची मस्ती चालणार नाही' , या शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना गुरुवारी खडसावले.

कोल्हापुरातील एका सोसायटीच्या वादातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राजेंद्र वरपे यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र, या प्रकरणी अद्यापही क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नसल्याने राजेंद्र वरपे यांनी गुरुवारी दानवे यांच्या कोल्हापूरातील जनता दरबारात दाद मागितली. वरपे यांचे म्हणणे एकून घेत दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन केला.

क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही ?, कोण हा राजेश क्षीरसागर ? त्याच्या बापाची जहागीर आहे का ? तुम्ही पोलीस त्यांना संरक्षण देता, कोणतेही कलम लावा, पण गुन्हा दाखल करा. पोलिसांची आणि क्षीरसागरची मस्ती चालणार नाही. अन्यथा येत्या अधिवेशनात तुमच्याविरोधातच आवाज उठवतो अशी तंबीच दानवे यांनी पंडित यांना दिली. त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके हे तत्काळ जनता दरबारात दाखल झाले. दानवे यांनी टिके यांना राजेंद्र वरपे यांच्या तक्रारी नुसार तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Rajendra Varpe was beaten up by Rajesh Kshirsagar, Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve scolded Kolhapur Superintendent of Police Mahendra Pandit on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.