शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

राजाराम कारखाना निवडणूक: वाढलेल्या टक्केवारीने वाढली निकालाची हुरहुर, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 12:50 IST

या निवडणुकीत यंत्रणा राबवण्यापासून, जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रकमेचे वाटप याचा विचार केला असता तेवढ्या रकमेतून नवा कारखाना उभा राहिला असता, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केली

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी ९१.१२ टक्के मतदान झाल्याने निकालाबद्दलची हुरहुर कमालीची वाढली आहे. गत निवडणुकीत सरासरी नव्वद टक्के मतदान झाले होते. दोन्ही बाजूंकडून सर्रास झालेले पैशाचे वाटप, प्रत्येक मतदार बाहेर काढण्यासाठी लागलेली यंत्रणा, प्रचारात उठलेली राळ आणि बोगस मतदान रोखण्यात आलेले यश यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस दिसली. सभासदांच्या मतांचा कौल मात्र मंगळवारीच स्पष्ट होईल.ही निवडणूक गेली वर्षभरापासून गाजते आहे. सुरुवातीला ती अपात्र सभासदांच्या लढ्यामुळे गाजली. त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. त्यानंतर विरोधी आघाडीचे तगडे उमेदवार अपात्र ठरण्यावरून गाजली. ती लढाईही उच्च न्यायालयापर्यंत गेली. या दोन्ही लढ्यांत सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतपेटीतील लढाई कुणाच्या बाजूने कौल देते याबद्दल अंदाज वर्तवणे मुश्कील झाले आहे.राजाराम कारखान्याची सत्ता ही महाडिक गटाकडे राहिलेली जिल्हा पातळीवरील एकमेव व महत्त्वाची सत्ता आहे. विधान परिषद, विधानसभा, गोकुळ आणि लोकसभेला पाठोपाठ पराभव झाल्यानंतर महाडिक गट जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफुटवर गेला; परंतु राज्यसभेला आकस्मिकपणे धनंजय महाडिक यांना भाजपने संधी मिळाली व पुन्हा या गटाला उभारी आली.पुढे राज्यात सत्तांतर झाल्याचा फायदाही राजारामच्या निवडणुकीत सभासद व उमेदवार अपात्र प्रकरणात सत्तारूढ गटाला झाला. त्यांच्या दृष्टीने राजारामची सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनीही सर्व पातळ्यांवर उतरून ही निवडणूक लढवली. बऱ्याचदा लोक कारखान्याची सत्ता व विधानसभा किंवा अन्य निवडणुकीतील यश याची फारच चौकसपणे निवड करतात. गेल्या २८ वर्षांत महाडिक यांचा दबदबा राहिला. त्यामुळे त्यांच्याशी जोडलेले लोक कितपत बाजूला जातात यावरच गुलाल ठरणार आहे.निवडणूक कोणतेही असो, ती सतेज पाटील यांनी एकदा अंगावर घेतली की मग मागेपुढे पाहायचे नाही. तिला भिडायचे याचा अनुभव लोकसभा व गोकुळच्या निवडणुकीतही आला होता. तशीच यंत्रणा त्यांनी या निवडणुकीत राबवली. को-जन, डिस्टलरी प्रकल्प, विस्तारीकरण, उसाला दर, कारखान्याचे बकालपण, सभासदांना मिळणारी वागणूक हे मुद्दे निवडणुकीत ऐरणीवर आणून त्यांनी मतदारांच्या भावनेला हात घातला.तगडे उमेदवार अपात्र ठरल्याने या निवडणुकीत त्यांच्या पॅनलमध्ये गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली. वाशीसारख्या एकाच गावांत तीन उमेदवार द्यावे लागले. त्यामुळे गावे व तगडे उमेदवार यांचा समतोल साधता आला नाही हे खरे असले तरी त्यांनी सतेज पाटील हेच उमेदवार आहेत, असे वातावरण निर्माण करण्यात यश मिळवले. त्यांची व्यक्तिगत राबणूक हीच लढतीत हवा निर्माण करणारी ठरली. मयत मतदान होणार नाही याची दक्षता घेतली. हातकणंगले तालुक्यात विनय कोरे यांनी एका सभेत भाषण केले; परंतु ते सक्रिय होणार नाहीत याची व्यवस्था केली. सर्जेराव माने यांचे बळ, गोकुळची सत्ता सोबत होती. अशा अनेक जोडण्या लावल्याने त्यांना विजयाचा पुरता आत्मविश्वास आहे.

नवा कारखाना झाला असता...

या निवडणुकीत यंत्रणा राबवण्यापासून, जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रकमेचे वाटप याचा विचार केला असता तेवढ्या रकमेतून नवा कारखाना उभा राहिला असता, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केली. अगोदर एका गटाने पाच हजार दिले, ते दुसऱ्या गटाला समजल्यावर त्यांनी दहा दिले. मग पहिल्या गटाने आणखी दहा हजार मताला दिले असे अनेक गावांत घडले. मतदारांनी दोघांकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे पैशाचा प्रभाव पडतो की, लोक कारभार पाहून जागरूकतेने मतदान करतात यावरही निकाल ठरेल. कुंभी-कासारी, राजाराममध्ये जे घडले ते ऐकून निवडणूक होणाऱ्या बिद्री, भोगावतीसारख्या इतर कारखानदारांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील