शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला तिसरा धक्का, उमेदवार अपात्रतेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:20 IST

निवडणूक निर्णय अधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालक व उच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी अपयश आल्याने विरोधी आघाडीला धक्का

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेल्या २९ जणांची याचिका बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे विरोधी आघाडीला हा धक्का मानला जात आहे.‘राजाराम’च्या निवडणुकीत कारखान्याच्या पोटनिवडणुकीचा भंग केला म्हणून विरोधी आघाडीच्या २९ जणांंचे ३० अर्ज व एक इतर अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी अपात्र ठरविले. याविरोधात प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे अपील केले होते, त्यावर सुनावणी होऊन सोमवारी त्यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. याविरोधात सोमवारी दुपारीच विरोधी आघाडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सकाळी सुनावणी झाली. सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कारखान्याचा पोटनियमानुसार करार केलेल्या क्षेत्रातील ऊस पुरवठा करणे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकाला बंधनकारक असल्याचे सत्तारूढ आघाडीच्या वकिलांनी मुद्दा मांडला. यावर, न्यायालयाने विरोधी आघाडीची याचिका फेटाळून लावली. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालक व उच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी अपयश आल्याने विरोधी आघाडीला हा धक्का मानला जात आहे.दोन्ही पॅनलची घोषणा करण्यात आली असून आज, गुरुवारी चिन्हे वाटप करण्यात येणार आहे. २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHigh Courtउच्च न्यायालय