शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Kolhapur- राजाराम कारखान्याच्या सत्तासंघर्षाला धार, सोशल मीडियावर जोरदार वॉर

By राजाराम लोंढे | Updated: April 8, 2023 13:56 IST

विरोधी आघाडी ‘औंदा आमचं ठरलंय कंडकाच पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन रिंगणात उतरली आहे. तर त्याला सत्तारुढ आघाडीने ‘सत्तेसाठी नाही सहकार, सभासदांच्या हक्कासाठी’ ही टॅगलाइनने उत्तर दिले

राजाराम लोंढे कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून व्यक्तिगत टीका-टिप्पणीबरोबरच कारभारावर आसूड ओढले जात आहेत. प्रचार सभेतील खडाखडीबरोबरच आता, सोशल मीडियातील वॉर जोरदार सुरू झाले असून माघारीनंतर संघर्ष टोकाला पोहोचणार, हे निश्चित आहे.‘राजाराम’ कारखान्याचा सत्तासंघर्षाला धार येत आहे. त्यात छाननीनंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर शब्दरूपी अस्त्रे सोडली जात आहेत. शह-काटशहाचे राजकारणाला उकळी येण्यास सुरुवात झाली असून, सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक व विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील हे कार्यक्षेत्रातील गाव अन् गाव पिंजून काढत आहेत. प्रचार सभेतून एकमेकांवर वार सुरू असतानाच सोशल मीडियातूनही दोन्हीकडून जोरदार हल्ले चढवले जात आहेत.विरोधी आघाडी ‘औंदा आमचं ठरलंय कंडकाच पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन रिंगणात उतरली आहे. तर त्याला सत्तारुढ आघाडीने ‘सत्तेसाठी नाही सहकार, सभासदांच्या हक्कासाठी’ ही टॅगलाइनने उत्तर दिले आहे. यासह सोशल मीडियातून वेगवेगळे एकमेकांना उघडे पाडण्याचा प्रकार सुरू आहे. आगामी काळात तो वाढत जाणार आहे.

जमीन सुपीक मग रिकव्हरी कमी कशी?दोन शेतकरी शेतात गप्पा मारत असताना, आमची जमीन सुपीक मग ‘राजाराम’ची रिकव्हरी कमी कशी? अरे, रिकव्हरी मारत्यात, दुसर काय. चांगल्या रिकव्हरीसाठी आता ठरलंय बघ कंडकाच पाडायचा.

काट्यात फरक दाखवा, दोन लाख बक्षीस मिळवाप्रचार सभेतून विरोधकांनी कारखान्याच्या वजन काट्यावरच प्रश्न उपस्थित केला. त्याला ‘राजाराम’च्या काट्यात फरक दाखवा, दोन लाख बक्षीस मिळवा, असे आव्हानच सत्तारुढ आघाडीने सोशल मीडियातून दिले आहे.

अरं ते तर येलूरचा ऊस नेणार‘टोळी कुठं चाललीय?,’ असा प्रश्न एक शेतकरी विचारतो, दुसरा शेतकरी म्हणतो, अरे कुठला म्हणजे स्वत:च्या रानातील ऊस तोडायला. म्हणजे ‘राजाराम’ कारखाना ऊस नेत नाही व्हय. त्यावर, अरं ते आमचा ऊस नेणार नाहीत, येलूरचा अगोदर तोडणार, असा टोला विराेधकांनी लगावला आहे.

विरोधकांचे शक्तिप्रदर्शन..सप्पय गंडलंयउमेदवारी अर्ज दाखल करताना विरोधी आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उपस्थितांना मीडियाच्या प्रतिनिधींना आपण सभासद आहात का? असे विचारले असता, नाही म्हणणाऱ्यांची संख्या दाखवत, विरोधकांचे शक्तिप्रदर्शन...सप्पय गंडलंय, असा टोला सत्तारुढ आघाडीने लगावला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक