ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:52 IST2020-07-02T16:52:28+5:302020-07-02T16:52:53+5:30
गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होत असला तरी तो वळवासारखाच पडत आहे. पडेल तिथेच जोरदार पडत असल्याने ऐन मान्सूनमध्ये वळीव पावसाची प्रचिती येत आहे. दुपारी कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला.

ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पाऊस
कोल्हापूर : गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होत असला तरी तो वळवासारखाच पडत आहे. पडेल तिथेच जोरदार पडत असल्याने ऐन मान्सूनमध्ये वळीव पावसाची प्रचिती येत आहे. दुपारी कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला.
तीन दिवसांनी म्हणजे रविवारी (दि. ५) पुनर्वसू (तरणा पाऊस) नक्षत्र सुरू होत आहे. ह्यआर्द्राह्ण नक्षत्र कोरडेच गेले. गेले दोन दिवस काही ठिकाणी पाऊस होत आहे. मात्र जिथे पडेल तिथेच जोरदार पाऊस कोसळत आहे.
मंगळवारी (दि. ३०) दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. रात्रभर काही तालुक्यांत नुसतीच भुरभुर होती. बुधवारी सकाळी पुन्हा खडखडीत ऊन पडले. पुन्हा दुपारी दोन वाजता कोल्हापूर शहरात अर्ध्या तासाच्या पावसाने झोडपून काढले. ऐन मान्सूनमध्ये वळीव पावसाचा अनुभव येत आहे.