कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सोमवारी (दि. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांची पळापळ झाली. काही ठिकाणी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.हवामान खात्याने राज्यात १० ते १२ जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाचा अंदाज वर्तविला होता. जिल्ह्यात सकाळी काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन हलक्या पावसाला सुरुवात झाली.
कसबा बावड्यापासून ते शाहू टोल नाक्यापर्यंत आणि तावडे हॉटेलपासून छत्रपती शिवाजी पुलापर्यंत शहरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे उमेदवारांना प्रचार सभा आणि फेऱ्या आटोपत्या घ्याव्या लागल्या. दरम्यान, पावसामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले.
Web Summary : Kolhapur witnessed unseasonal rainfall disrupting municipal election campaigns. Sudden showers caused candidates and supporters to scramble, forcing the early conclusion of rallies and processions. The rain provided a slight respite from the cold.
Web Summary : कोल्हापुर में बेमौसम बारिश ने नगर निगम चुनाव प्रचार बाधित किया। अचानक हुई बारिश से उम्मीदवारों और समर्थकों में अफरा-तफरी मच गई, जिससे रैलियां और जुलूस जल्दी समाप्त करने पड़े। बारिश से ठंड से थोड़ी राहत मिली।