शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुवाधार पाऊस; पंचगंगेच्या पातळीत वाढ

By admin | Updated: July 27, 2015 00:43 IST

गगनबावड्यात अतिवृष्टी : पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर आज, सोमवारी सकाळपर्यंत पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडू शकते. पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप राहिली. दुपारी बारानंतर त्याने काहीशी विश्रांती घेऊन दुपारी अडीचनंतर पुन्हा दमदार सुरुवात केली. दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत पावसाने एकसारखे झोडपल्याने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत होते. सुटीचा दिवस असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसात तारांबळ उडाली. ग्रामीण भागातही दमदार पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणक्षेत्रात ८०, वारणा परिसरात २५, कासारी धरणक्षेत्रात ७०, तर कुंभी धरणक्षेत्रात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण ६२ टक्के, वारणा ८१, तर दूधगंगा ५२ टक्के भरले आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ८१५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. भोगावती, कुंभी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पसरले असून, पंचगंगेची पातळी सायंकाळी सातपर्यंत २२ फुटांपर्यंत पोहोचली होती. रात्रभर असाच पाऊस राहिला तर आज, सोमवारी सकाळपर्यंत पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. शिरोळ, तेरवाड बंधारा पाण्याखाली कुरुंदवाड : पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पंचगंगेचे पाणी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील तेरवाड, शिरोळ बंधारा पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, तालुक्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जुलै महिना संपला तरी अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. सोयाबीन, भुईमूग, फळभाज्यांसह इतर पिकांची वाढ खुंटली आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात फरक पडून ढगाळ वातावरण झाले असले तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. मात्र, धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पाऊस होत असल्याने पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे या नदीवरील तेरवाड व शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. (वार्ताहर)