पावसाची विश्रांती : अवघ्या चार तालुक्यात तुरळक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 05:49 PM2019-08-22T17:49:50+5:302019-08-22T17:56:25+5:30

दिवसभरात जिल्ह्यात केवळ 9.19 मि.मी इतका पाऊस झाल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2164.60 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.77 मिमी इतकी नोंद झाली.

Rainfall Rest: Heavy rainfall in only four talukas | पावसाची विश्रांती : अवघ्या चार तालुक्यात तुरळक पाऊस

पावसाची विश्रांती : अवघ्या चार तालुक्यात तुरळक पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाची विश्रांती : अवघ्या चार तालुक्यात तुरळक पाऊसराधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : दिवसभरात जिल्ह्यात केवळ 9.19 मि.मी इतका पाऊस झाल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2164.60 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.77 मिमी इतकी नोंद झाली.

तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-

हातकणंगले - 0.13 मिमी एकूण 768.04,
गगनबावडा - 8 मिमी एकूण 5193.50,
भुदरगड 0.40 मिमी एकूण 2311.20
चंदगड 0.67 मिमी एकूण 2679.17 

राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

राधानगरी विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 13.10 फूट असून, एकूण 1 बंधारा पाण्याखाली आहे.

राधानगरी धरणात आज अखेर 7.90 टीएमसी पाणीसाठा आहे. तुळशी मोठा प्रकल्प, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी असा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 121.26 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 100.50 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा

  • तुळशी 3.47 टीएमसी,
  • वारणा 32.46 टीएमसी,
  • दूधगंगा 24.44 टीएमसी,
  • कासारी 2.77 टीएमसी,
  • कडवी 2.52 टीएमसी,
  • कुंभी 2.54 टीएमसी,
  • पाटगाव 3.68 टीएमसी,
  • चिकोत्रा 1.51,
  • चित्री 1.87 टीएमसी,
  • जंगमहट्टी 1.22 टीएमसी,
  • घटप्रभा 1.56 टीएमसी,
  • जांबरे 0.82 टीएमसी,
  • कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी 


बंधाऱ्यांची पाणी पातळी 

  • राजाराम 13.10 फूट,
  • सुर्वे 16.2 फूट, रुई 42 फूट,
  • इचलकरंजी 39 फूट,
  • तेरवाड 37.9 फूट,
  • शिरोळ 30 फूट,
  • नृसिंहवाडी 26.9 फूट,
  • राजापूर 16.9 फूट 
  • सांगली 9 फूट
  • अंकली 6.11 फूट
     

 

Web Title: Rainfall Rest: Heavy rainfall in only four talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.