कोल्हापूर  जिल्ह्यात पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:47 AM2020-06-22T11:47:35+5:302020-06-22T11:48:39+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८०० घनफूट जलविसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळीही १९.४ फुटांवर आली आहे.

Rainfall in Kolhapur district | कोल्हापूर  जिल्ह्यात पावसाची उघडीप

कोल्हापुरात रविवारी पावसाने पूर्णपणे उसंत घेतल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली. पंचगंगा नदीकाठावरील पाण्याखाली गेलेली मंदिरे हळूहळू मोकळी होऊ लागली आहेत. (छाया- नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देकोल्हापूर  जिल्ह्यात पावसाची उघडीपगगनबावड्यात काल २३.५० मिमी पाऊस



कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८०० घनफूट जलविसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळीही १९.४ फुटांवर आली आहे.

गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. रविवारी सकाळपासूनच खडखडीत ऊन राहिले. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट होत आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी रविवारी दिवसभरात दीड फुटाने कमी झाली. पंचगंगेसह इतर नद्यांवरील १२ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.

गगनबावड्यात काल २३.५० मिमी पाऊस

जिल्ह्यात काल दिवसभरात  शाहुवाडी तालुक्यात २३.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. 

पन्हाळा- ३.५७ मिमी, शाहुवाडी- ८.५० मिमी, गगनबावडा-२३.५० मिमी, कागल- १.१४, भुदरगड- ०.४०  मिमी, आजरा- ९.५० मिमी, चंदगड- २.३३ मिमी पाऊस  तर हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, करवीर व कागल या तालुक्यात पाऊस निरंक आहे.
 

Web Title: Rainfall in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.