कोल्हापूरमध्ये पावसाच्या सरी, झाड कोसळले- एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 18:13 IST2020-05-31T17:50:19+5:302020-05-31T18:13:21+5:30
कोल्हापूर : शहरातील टाकाळा येथे रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका घरावर भले मोठे झाड पडले. यात सुरेश केसरकर ही ...

कोल्हापूरमध्ये पावसाच्या सरी, झाड कोसळले- एक जखमी
ठळक मुद्देहे झाड खूप वर्षापूर्वीचे होते अशी माहिती मिळत आहे.
कोल्हापूर: शहरातील टाकाळा येथे रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका घरावर भले मोठे झाड पडले. यात सुरेश केसरकर ही व्यक्ती जखमी झाली असून, त्यांना अधिक उपचारासाठी सेवा रुग्णालयात दाखल केले आहे. यात घराचे ही मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले . शहरात आज सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या यावेळी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे हे झाड पडल्याचे सांगण्यात येत आहे. हे झाड खूप वर्षापूर्वीचे होते अशी माहिती मिळत आहे.