मटका अड्ड्यावर छापे
By Admin | Updated: July 10, 2014 23:46 IST2014-07-10T23:45:22+5:302014-07-10T23:46:24+5:30
लाखाचा मुद्देमाल जप्त : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाचजणांना अटक

मटका अड्ड्यावर छापे
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महालक्ष्मी चेंबर्स व विचारे माळ येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज, गुरुवारी छापा टाकून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल हॅँडसेट व मटक्याचे साहित्य असा सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स व विचारे कॉम्लेक्समध्ये राजरोस मटका सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या टीमने दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापा टाकून पाचजणांना अटक केली. संशयित विष्णू रामचंद्र देशमुख (वय ५५, रा. लक्षतीर्थ वसाहत), अमित सदाशिव कांबळे (४०, रा. रुकडी, ता. हातकणंगले), इनायत नुरमंहमद बागवान (५१, रा. सोमवार पेठ), शकील रसून शेख (४२, यशवंत कॉलनी), भगवान दिनकर सोहनी (४०, रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. बुकी मालक अभिजित यादव व संजय देसाई (रा. शाहूपुरी) हे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)